महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या नवनीत कौर राणा (MP Navneet Kaur Rana) यांना अॅसिड टाकून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) लेटरहेडवरुन धमकी आल्याचा दावा करत त्यांनी दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे, या धमकीच्या पत्रात कोणत्याही शिवसैनिकाचे नाव नाही. परंतु, हे धमकीचे पत्र शिवसेना नेते संजय राऊत आणि आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावर पाठवण्यात आले आहे, असे नवनीत कौर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारी एफआयआरची प्रत 13 फेब्रुवारी 2021 असल्याचे कळत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील (8 फेब्रुवारी) माझ्या भाषणाविरोधात शिवसेनेचे लेटरहेड असलेले निनावी पत्र देऊन अपमान आणि शिवीगाळ करण्यात आली आहे. मला आणि माझ्या पतीला गेल्या आठ दिवसांत जीवे मारण्याची तसेच अॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे, असे नवनीत कौर राणा यांनी तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात एबीपीने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन नारायण राणे यांचे महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप
ट्विट-
अमरावती से सांसद नवनीत राणा को जान से मारने की धमकी-शिवसेना के ख़िलाफ़ लोकसभा में बोलने पर सांसद नवनीत राणा को जान से मारने और तेज़ाब फेकने की धमकी दी गई है, धमकी की चिट्ठी शिवसेना के लेटरहेड पर भेजी गई है, नोर्थ एवेनु थाने में FIR दर्ज कराई गयी है. pic.twitter.com/nCKWSArv1c
— Vikas Bhadauria (ABP News) (@vikasbha) February 16, 2021
नवनीत राणा यांना आलेले धमकीचे पत्र शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर असल्यामुळे राणा यांनी शिवसेनेवर थेट आरोप केले आहेत. परंतु, नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या पत्रावर कोणत्याही शिवसेना नेत्याचे नाव नाही. तसेच, हे पत्र शिवसेनेच्या खऱ्या लेटरहेडवर असल्याची कोणतीही पुष्टी अजून झालेली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.