रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी अमरावती लोकसभा मतदार संघामधून (Amravati Lok Sabha constituency) दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीनं (VBA) आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे आनंदराज आंबेडकरांनी आपला लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान अमरावतीमध्ये भाजपाला यश मिळू नये म्हणून त्यांनी वंचित च्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.
बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान भाऊ रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी 2 एप्रिलला अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. वंचित बहुजन आघाडीकडे पाठिंब्यासाठी मागणी केली होती, परंतु वंचितनं पाठिंबा न दिल्यानं आनंदराज आंबेडकर यांनी माघार घेतली. पण आता एक पत्र लिहत त्यांनी वंचितचा उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्याला आपला पाठिंबा असेल असं जाहीर केले आहे.
भाजपा ने अमरावती मधून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. यंदा नवनीत राणा पहिल्यांदाच भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. मागील निवडणूकीर राणा एनसीपीच्या पाठिंब्यावर लोकसभेत गेल्या होत्या. आज नवनीत राणा देखील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. वंचित देखील महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील होते पण अखेरच्या टप्प्यात बोलणी फिस्कटल्याने त्यांनी एकला चलो चा नारा दिला आहे.