महाराष्ट्र

Prakash Ambedkar hospitalised: अँड. प्रकाश आंबेडकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अँजिओग्राफी शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

Ravi Raja Quit Congress: रवी राजा यांचा भाजप प्रवेश, Sion-Koliwada मध्ये काँग्रेसला झटका; महाविकासआघाडीला फटका

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजा यांच्या जाण्याने सायन-कोळीवाडामधील काँग्रेसच्या प्रभावावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणूक 2024: महाविकासआघाडी आणि महायुती सोडवणार का बंडाचे ग्रहण? कुणाला विधानपरिषद, काहींना महामंडळाचे आमिष

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाविकासआघाडीमध्ये एका बाजूला शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुले, जयंत पाटील, संजय राऊत, नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे बंडखोरांशी चर्चा करत आहेत. दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याद्वारे बंडखोरांशी चर्चा सुरु आहे.

Thane-Belapur Highway Accident: ठाणे-बेलापूर महामार्गावर रबाळे येथे खासगी बसची पादचाऱ्यांना धडक; 2 ठार, 3 जखमी

Bhakti Aghav

पादचाऱ्यांना बसने धडक देणाऱ्या चालकाचे नाव रबी दिपू देब (वय, 23) असं आहे. ठाण्याकडे जाणाऱ्या देबचीच चूक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला.

Advertisement

Cylinder Blast In Navi Mumbai Ulwe: नवी मुंबईतील उलवे येथे सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, एक जखमी

Bhakti Aghav

सिलिंडरचा स्फोट झाल्याने दुकानाला आग लागली. तेथे उपस्थित लोकांनी तातडीने अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Bandra Terminus Stampede: आता प्लॅटफॉर्मवर मोठ्या आकाराच्या वस्तूंवर बंदी, ट्रेनमधील सामानावर वजनाची मर्यादा; वांद्रे टर्मिनस चेंगराचेंगरीनंतर पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय

Prashant Joshi

वांद्रे टर्मिनस येथे नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, पश्चिम रेल्वेने स्टेशन परिसर आणि प्लॅटफॉर्मवर ड्रम आणि इतर तत्सम वस्तू तसेच मोठ्या आकाराच्या वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Election 2024: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत आतापर्यंत 187 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Prashant Joshi

निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे.

Maharashtra's Richest Candidate: भाजपचे पराग शाह राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार; आमदाराच्या संपत्तीत 575% वाढ

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आमदार पराग शाह सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ते घाटकोपर पूर्व येथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांनी आपली संपत्ती 3383 कोटी रुपये इतकी असल्याचे जाहीर केले आहे. 2019 पासून शाह यांच्या संपत्तीत 575% वाढ झाली आहे.

Advertisement

Pune Metro Update: पुणेकरांनो लक्ष द्या! लक्ष्मीपूजनामुळे मेट्रो सेवा शुक्रवारी संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत बंद राहणार

Prashant Joshi

शुक्रवारी (2 नोव्हेंबर) लक्ष्मीपूजनामुळे दोन्ही मार्गावरील (पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी) मेट्रो सेवा संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

Paresh Dhanani Suffers Heart Attack: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते परेश धनानी यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

Bhakti Aghav

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुजरात काँग्रेसचे नेते परेश धनानी (Paresh Dhanani) यांना मंगळवारी नाशिकमध्ये हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Ulhasnagar Market Fire: उल्हासनगरमधील न्यू गजानन मार्केटमध्ये भीषण आग; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

संध्याकाळी उशिरा लागली ही आग आजूबाजूच्या दुकानांपर्यंत झपाट्याने पसरली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Diwali 2024: सोसायटीत दिवे लावाल तर बलात्कार करु, समाजकंटकांची महिलांना धमकी; व्हिडिओ व्हायरल

Shreya Varke

दिवाळी हा हिंदूंमध्ये साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा सण आहे, दिवाळीच्या आगमनापूर्वी संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, दिवाळी 2024 पूर्वी आपल्या सोसायटीचे रस्ते सजवणाऱ्या या महिलांसाठी हा उत्साह दुखात बदलला आहे. एक संशयास्पद व्हिडिओ ऑनलाइन शेअर करण्यात आला होता ज्यामध्ये पुरुषांचा एक गट महिलांना धमकावताना, शिवीगाळ करताना दिसत आहे. कारण पुरुष समाजाच्या रस्त्यावर दिवा लावण्याच्या विरोधात होते.

Advertisement

Devendra Fadnavis On Amit Thackeray: अमित ठाकरे यांच्याबद्दल भाजपला उमाळा कायम; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची लालसा नाही

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मनसे उमेदवार अमित ठाकरे यांना महायुतीने पाठिंबा द्यावा असे आजही आम्हाला वाटते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा याच विचाराचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Maharashtra HSC Board Exam 2024: बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

Dipali Nevarekar

बारावीचे अर्ज भरण्यासाठी 30 ऑक्टोबर पर्यंत मुदत होती पण त्याला मुदतवाढ देऊन ती आता 22 नोव्हेंबर पर्यंत करण्यात आली आहे.

श्रीनिवास वनगा 36 तासांनंतर कुटुंबियांच्या संपर्कात; मध्यरात्री परतले पण पुन्हा घराबाहेर पडल्याची माहिती

Dipali Nevarekar

सध्या पालघर मधून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता श्रीनिवास पुढे काय भूमिका घेणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

Guidelines For Use Of Firecrackers: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रात्री 10 वाजेपर्यंत फटाके फोडता येणार; फटाक्यांच्या वापरासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

Bhakti Aghav

फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध आणि दम्याचा त्रास असलेल्या लोकांना मोठा त्रास होत आहे. आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन महानगरपालिकेने निवेदनाद्वारे केले आहे.

Advertisement

Maharashtra Assembly Election 2024: आज शेवटच्या दिवशी राज्यातून 288 मतदारसंघासाठी 7995 उमेदवारांचे 10 हजार 905 नामनिर्देशन पत्र दाखल

Prashant Joshi

आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती. आजपर्यंत आलेल्या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल.

Maharashtra Assembly Polls 2024: उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर

टीम लेटेस्टली

सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहणार आहे. पोटकलम (1) नुसार मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

Eknath Shinde vs Ajit Pawar: एकनाथ शिंदे यांचा अजित पवार यांना धक्का; एबी फॉर्म पाठविण्यासाठी हेलीकॉप्टरचा वापर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शिवसेना (Shiv Sena) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यातील संघर्ष अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना अगदी अंतिम क्षणी शिंदे यांच्या सेनेने आपल्या उमेदवारांना चक्क हेलिकॉप्टरद्वारे एबी फॉर्म पाठविले आहेत.

Navi Mumbai Airport: नवी मुंबई येथील अदानी समूहाचे विमानतळ 2025 च्या पूर्वार्धात सुरू होणार; CFO Jugeshinder 'Robbie' Singh यांची माहिती

Prashant Joshi

या महिन्याच्या सुरुवातीला अदानी समूहाने नवी मुंबईच्या धावपट्टीवर भारतीय हवाई दलाच्या विमानांचे यशस्वीरित्या लँडिंग केले होते. सिंग यांनी अदानी फ्लॅगशिप कंपनीच्या तिमाही आणि सहामाही निकालांची घोषणा करताना सांगितले की, ते पुढील वर्षी, 2025 च्या पहिल्या सहामाहीत विमानतळाचे ऑपरेशन सुरू करण्याच्या मार्गावर आहेत.

Advertisement
Advertisement