Prakash Ambedkar hospitalised: अँड. प्रकाश आंबेडकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अँजिओग्राफी शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

Prakash Ambedkar | (Photo credit: archived, edited, representative image)

Prakash Ambedkar Health Update: वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना छातीत दुखू (Chest Pain) लागल्याने गुरुवारी (31 ऑक्टोबर) पहाटे पुणे (Pune) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पक्षाच्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी आढळल्यामुळे त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आंबेडकरांची प्रकृती स्थिर आहे मात्र, त्यांच्या हृदयाची तपासणी केल्यानंतर डॉक्टर त्यांच्यावर अँजिओग्राफी (Angiography) शस्त्रक्रिया करु शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. आंबेडकर यांच्या प्रकृतीबद्दल कुटुंबाने सध्या माध्यमांपासून अलिप्तता बाळगली आहे. त्यामुळे याबाबत कुटुंबीयांकडून विस्तृत माहिती मिळू शकली नाही.

पक्षाच्या वंचित बहुजन आघाडी या अधिकृत एक्स हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकर पुढील 3-5 दिवस निरीक्षणाखाली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबेडकरांना पूर्ण आराम मिळेपर्यंत पक्षाची जबाबदारी व्हीबीएच्या प्रदेश अध्यक्ष रेखा ताई ठाकूर यांच्याकडे तात्पूरत्या स्वरुपातअसेल. निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या पाठिंब्याने ठाकूर आंबेडकरांच्या पुनर्प्राप्ती कालावधीत वंबआचे नेतृत्व करतील.

वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्वक कोणाकडे?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)