Maharashtra Assembly Election 2024: आज शेवटच्या दिवशी राज्यातून 288 मतदारसंघासाठी 7995 उमेदवारांचे 10 हजार 905 नामनिर्देशन पत्र दाखल
आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती. आजपर्यंत आलेल्या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता आज २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती. आजपर्यंत आलेल्या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Polls 2024: उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर)
Maharashtra Assembly Election 2024:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)