Thane-Belapur Highway Accident: ठाणे-बेलापूर महामार्गावर रबाळे येथे खासगी बसची पादचाऱ्यांना धडक; 2 ठार, 3 जखमी
ठाण्याकडे जाणाऱ्या देबचीच चूक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला.
Thane-Belapur Highway Accident: ठाणे बेलापूर महामार्गावर (Thane-Belapur Highway) रबाळे (Rabale) येथे गुरुवारी सकाळी खासगी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोघांचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले. विजयमाला सलोबा सुतार (वय, 40) आणि अनिश देवनारायण चौहान (वय, 40) अशी मृतांची नावे आहेत.
पादचाऱ्यांना बसने धडक देणाऱ्या चालकाचे नाव रबी दिपू देब (वय, 23) असं आहे. ठाण्याकडे जाणाऱ्या देबचीच चूक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला. रबाळे येथील झेब्रा क्रॉसिंगवर आल्यानंतर देबचे 40 आसनी बसवरील नियंत्रण सुटले. घरकाम करणाऱ्या विजयमाला सलोबा सुतार या ऐरोलीला कामानिमित्त जात असताना भरधाव वेगात असलेल्या बसने झेब्रा क्रॉसिंगवर त्यांच्यासह चौहान यांना धडक दिली. (हेही वाचा -Himachal Pradesh Accident: हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये कार दरीत कोसळली; पाच जणांचा मृत्यू)
दरम्यान, बस पादचाऱ्यांना धडकल्यानंतर, फूटपाथवर थांबण्यापूर्वी अनेक पार्क केलेल्या वाहनांवर धडकली. अपघातात तीन रिक्षा आणि एका इनोव्हा वाहनाचे नुकसान झाले. राहुल रमेश बेनबंसी आणि आरोही संजय शर्मा अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय चाचणीत बसचा चालक नशेत नसल्याचे आढळून आले. (हेही वाचा - Ballia Accident: बिहारमधील बलिया येथे पोलिसांच्या बसला भीषण अपघात; 29 पोलिस कर्मचारी जखमी (Watch Video))
बस चालकाने सांगितले की, स्टीयरिंग व्हील जाम झाल्याने बस बिघडली. त्याने सुरुवातीला फूटपाथवरून धावण्याचा प्रयत्न केला पण बस नियंत्रणाबाहेर गेली आणि पादचाऱ्यांना धडकली. बस चालकाविरोधात कलम 281, 106(1), 125 (A) and B, 324 (5) सह मोटार वाहन कायदा (एमव्हीए) आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या 134 (A) (B) आणि184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.