Accident (फोटो सौजन्य - ANI)

Ratnagiri Accident News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणा नाका येथे भीषण अपघात झाला. आज सोमवारी सकाळी (Car Accident)ही घटना घडली. अपाघातावेळी कारमध्ये पाच-सहा जण होते. कार जगबुडी नदीच्या पुलावरुन जात असताना ही कार ब्रिजवरून सुमारे 100 फूट खोल कोसळल्याची माहिती आहे. मुंबईहून देवरुख अंतयविधीसाठी जात असताना हा अपघात घडला. या घटनेत कारचालक गंभीर जखमी झाला आहे. तर, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात एवढआ भीषण होता की त्यात सर्व मृतांचा जागीच जीव गेला. हे सर्व मुंबईतील राहणारे असल्याची माहिती आहे.

मेधा परमेश पराडकर , सौरभ परमेश पराडकर (22), मिताली विवेक मोरे (45) , निहार विवेक मोरे (19) , श्रेयस राजेंद्र सावंत (23) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. ही कुटुंबे मुंबई मिरारोड-भाईंदर येथून रात्री साडेअकराच्या सुमारास किया कारने गावी देवरूख येथे जात होते. Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

ही घटना पहाटे पाच ते साडेपाच्या सुमारास घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच खेड येथील स्थानिकांनी पोलिसांना तातडीन कळवलं पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कारमधून जखमींना तातडीने बाहेर काढून कळंबणी येथील रुग्णालयात तातडीने हलवण्यात आलं. मात्र, या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

या अपघातात परमेश पराडकर, विवेक मोरे वाचले आहेत . गंभीर जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय हलवण्यात आलं आहे. तर, विवेक मोरे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत, त्यांनाही खेड येथे रुग्णालय पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.