श्रीनिवास वनगा 36 तासांनंतर कुटुंबियांच्या संपर्कात; मध्यरात्री परतले पण पुन्हा घराबाहेर पडल्याची माहिती
आता श्रीनिवास पुढे काय भूमिका घेणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा (Shrinivas Vanga) यांना विधानसभा निवडणूकीत डावलण्यात आल्याने ते नाउमेद झाले होते. अशात ते 36 तास नॉट रिचेबल होते पण मीडीया रिपोर्ट्सनुसार रात्री 3च्या सुमारास त्यांचा कुटूंबाशी संपर्क झाला आहे. श्रीनिवास आपल्या घरी परत आले होते पण काही वेळातच पुन्हा ते मित्रांसोबत घराबाहेर पडल्याची माहितू आहे. 'विधानसभेत उमेदवारी न मिळाल्याने व्यथित आहे आणि आरामाची गरज आहे.' असं सांगून ते बाहेर पडले आहेत. दरम्यान आपण कुठे जात आहोत? याची माहिती त्यांनी कुटुंबीयांनाही दिलेली नाही.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाच्या वेळी श्रीनिवास वनगा त्यांच्यासोबत होते. श्रीनिवास यांच्याच मुलाच्या बर्थ डे चं कारण सांगत आमदार बाहेर पडले होते. श्रीनिवास यांनी पालघर आणि डहाणू या दोन्ही जागांवर आपलं नाव जाहीर न झाल्याने एकनाथ शिंदे यांच्याबद्दल नाराजी उघडपणे बोलून दाखवली. यावेळी 'उद्धव ठाकरे देवमाणूस आहेत. त्यांची आता माफी पण कशी मागू' असे ते प्रतिक्रिया देताना म्हणाले. वनगा यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून शहर प्रमुख त्यांच्या घरी पोहचले आणि त्यांनि कुटुंबियांकडून सारी माहिती घेतली आहे. दुसरीकडे वनगा यांच्या पत्नीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपर्क साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी वनगांना विधान परिषद उमेदवारी दिली जाईल असं म्हटलं आहे.
सध्या पालघर मधून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता श्रीनिवास पुढे काय भूमिका घेणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. Shrinivas Vanga Not Reachable: विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी डावललेले आमदार श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल; नैराश्यात असल्याचा कुटुंबाचा दावा .
20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.