Navi Mumbai Airport: नवी मुंबई येथील अदानी समूहाचे विमानतळ 2025 च्या पूर्वार्धात सुरू होणार; CFO Jugeshinder 'Robbie' Singh यांची माहिती

सिंग यांनी अदानी फ्लॅगशिप कंपनीच्या तिमाही आणि सहामाही निकालांची घोषणा करताना सांगितले की, ते पुढील वर्षी, 2025 च्या पहिल्या सहामाहीत विमानतळाचे ऑपरेशन सुरू करण्याच्या मार्गावर आहेत.

Flights | (Photo Credit - X/ANI)

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बाब आहे. अदानी समूहाचे सीएफओ, जुगशिंदर 'रॉबी' सिंग (Jugeshinder 'Robbie' Singh) यांनी मंगळवारी सांगितले की, नवी मुंबई येथे अदानी समूहाचे नव्याने बांधलेले विमानतळ (Navi Mumbai Airport) 2025 च्या पूर्वार्धात सुरू होईल. या महिन्याच्या सुरुवातीला अदानी समूहाने नवी मुंबईच्या धावपट्टीवर भारतीय हवाई दलाच्या विमानांचे यशस्वीरित्या लँडिंग केले होते. सिंग यांनी अदानी फ्लॅगशिप कंपनीच्या तिमाही आणि सहामाही निकालांची घोषणा करताना सांगितले की, ते पुढील वर्षी, 2025 च्या पहिल्या सहामाहीत विमानतळाचे ऑपरेशन सुरू करण्याच्या मार्गावर आहेत.

सिंग यांनी एका व्हिडिओ संदेशात भागधारकांना सांगितले की, ते सर्व सात ऑपरेशनल विमानतळांवर सहा नवीन मार्ग, सहा नवीन एअरलाइन्स आणि 13 नवीन उड्डाणे जोडण्यात यशस्वी झाले आहेत.’ नवी मुंबई विमानतळावर मोठी व्यावसायिक विमाने, आधुनिक प्रवासी टर्मिनल आणि प्रगत हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली हाताळण्यास सक्षम असलेली 3,700 मीटरची धावपट्टी असेल. या विमानतळाचे टर्मिनल 1 दरवर्षी 20 दशलक्ष प्रवासी हाताळेल असा अंदाज आहे. पूर्ण झाल्यावर, त्यावर प्रति वर्ष 90 दशलक्ष प्रवासी हाताळण्याची एकूण क्षमता असेल.

याआधी 2019 मध्ये अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी असलेल्या, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची 100 टक्के उपकंपनी म्हणून अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचा समावेश करण्यात आला. अदानी समूह सहा विमानतळांचे ऑपरेशन, व्यवस्थापन आणि विकास यासाठी सर्वाधिक बोली लावणारा म्हणून उदयास आला होता. यामध्ये अहमदाबाद, लखनौ, मंगळुरु, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरमयांचा समावेश आहे. अदानी विमानतळ आता 25 टक्के प्रवासी आणि भारतातील 33 टक्के हवाई मालवाहतूक हाताळते. (हेही वाचा: Pune to Goa and Jalgaon Flight: पुणेकरांना दिलासा! FLY91 ने सुरु केली पुणे ते गोवा आणि जळगाव मार्गावर दैनिक विमान सेवा, जाणून घ्या वेळा)

अहवालानुसार, जुलै-सप्टेंबर तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा 664 टक्क्यांनी वाढून 1,741 कोटी रुपये झाला आहे. 2023 मध्ये तो 228 कोटी रुपये होता. आतापर्यंत 2024-25 च्या दोन तिमाहींमध्ये- एप्रिल-जून आणि जुलै-सप्टेंबरमध्ये एकूण नफा 254 टक्क्यांनी वाढून 3,196 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत त्यामध्ये 15 टक्क्यांनी वाढ होऊन तो 23,196 रुपये झाला. एप्रिल-जून आणि जुलै-सप्टेंबर मिळून एकूण उत्पन्न 14 टक्क्यांनी वाढून 49,263 कोटी रुपये होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif