Devendra Fadnavis On Amit Thackeray: अमित ठाकरे यांच्याबद्दल भाजपला उमाळा कायम; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची लालसा नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा याच विचाराचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि याच पक्षाचे माहिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमति ठाकरे (Amit Thackeray) यांच्या प्रति भारतीय जनता पक्षास निर्माण झालेले प्रेम आजही कायम आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही हे प्रेम एका खासगी वृत्तवाहिणीच्या कार्यक्रमात बोलून दाखवले. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली आहे. त्यामुळे या वेळी त्यांना एखाद्या मतदारसंघात मागितली असेल तर, आम्ही ती द्यायला हवी, असे आमचे मत असलयाचे ते म्हणाले. शिवाय, एकनाथ शिंदे यांचेही मत वेगळे नव्हेत किंवा नाही, असेही त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री पदाची लाससा नाही
देवेंद्र फडणवीस हे एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी आपण या राज्याचे सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो आहोत. आजवरच्या इतिहासात केवळ वसंतराव नाईक आणि मी (फडणवीस) वगळता कोणीही सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाही. त्यामुळे आता मला त्या पदाची लालसा राहिली नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पडत राहणार, असे ते म्हणाले. दरम्यान, तुम्हाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची इच्छा आहे काय, असे विचारले असता राजकारणामध्ये अशा चर्चा होतच राहतात. त्याला उत्तरे द्यायची नसतात. मी विविध पदांवर काम केले आहे. आर्थिक विषयांत काम करणे ही माझी आवड आहे. वकीली करण्याचे माझे स्वप्न होते, पण आता ते भंगले आहे. त्यामुळे जनतेची वकीली करण्यात आनंद असल्याचे ते म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदाच्या चेहरावरून देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवार यांना थेट आव्हान; पहा काय म्हणाले?)
एकनाथ शिंदे यांचीही तिच इच्छा
अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, असे महायुतीतील अनेक नेत्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही तशीच इच्छा आहे. मात्र, आपण या ठिकाणी उमेदवार उभा केला नाही तर सर्व मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जातील. त्यामुळे आपण उमेदवार उभा करायला हवा, अशी भूमिका त्यांच्या पक्षातील सहकारी नेत्यांनी मांडली. त्यामुळे सदार सरवणकर यांचा निवडणूक अर्ज दाखल झाला आहे. त्यांनी माघार न घेताल उमेदवारी कायम ठेवली आहे, असे ते म्हणाले. (हेही वाचा, Mahim Vidhan Sabha Constituency: सदा सरवणकर अमित ठाकरे यांच्या विरूद्ध विधानसभा लढवण्यावर ठाम; जाहीर केला नामांकन अर्ज भरण्याची वेळ, तारीख)
दरम्यान, अनिल देशमुख यांनी केले आरोप, मनसूख हिरेन हत्या प्रकरण, अजित पवार सिंचन घोटाला, त्यात झालेला दिवंगत नेते आर आर पाटील यांचा उल्लेख या सर्वांवरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यावर आता विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता आहे.