Eknath Shinde vs Ajit Pawar: एकनाथ शिंदे यांचा अजित पवार यांना धक्का; एबी फॉर्म पाठविण्यासाठी हेलीकॉप्टरचा वापर
त्याचे प्रमुख कारण म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना अगदी अंतिम क्षणी शिंदे यांच्या सेनेने आपल्या उमेदवारांना चक्क हेलिकॉप्टरद्वारे एबी फॉर्म पाठविले आहेत.
Assembly Election 2024: विधानसभा निवडणूक 2024 मध्ये केवळ महाविकासआघाडीमध्येच तिढा आहे असे मुळीच नव्हे. महायुतीमध्येही तेवढाच संघर्ष आहे. जागावाटपात जरी भाजप (BJP) मोठा भाऊ दिसत असला तरी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शिवसेना (Shiv Sena) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यातील संघर्ष अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना अगदी अंतिम क्षणी शिंदे यांच्या सेनेने आपल्या उमेदवारांना चक्क हेलिकॉप्टरद्वारे एबी फॉर्म पाठविले आहेत. धक्कादायक असेल की, हे उमेदवार अजित पवार यांच्या उमेदवारांच्या विरोधात उभे आहेत.
दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघात डबल गेम?
अजित पवार यांच्या पक्षाकडून दिंडोरी आणि देवळाली विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे नरहरी झिरवाळ आणि सरोज अहिरे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे महायुतीचा विचार करता युतीधर्म म्हणून या ठिकाणी भाजप किंवा शिवसेना पक्षाचा उमेदवार असणे अपेक्षीत नाही. असे असले तरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या उमेदवारांना चक्क चॉपर हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पोहोचले आहेत. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, दिंडोरी येथून धनराज महाले आणि देवळाली येथून राजश्री अहिरराव हे शिवसेना पक्षाकडून लढत आहेत. ज्यांना हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले गेले. त्यामुळे महायुतीमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. (हेही वाचा, Baramati Vidhan Sabha: शरद पवार यांनी केली अजित पवार यांची नक्कल; सभेत पिकला हशा, जोरदार घोषणाबाजी)
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये मोठा संघर्ष आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचे चिरंजीव समीर यांनी दावेदारी केली आहे. तर सेनेचे सुहास कांदे हे येथील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे विद्यमान आमदाराला तिकट मिळणार हे जवळपास निश्चित असताना राष्ट्रवादीने त्या मतदारसंघावर दावा सांगितल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. (हेही वाच, Maha Vikas Aghadi Seat Sharing: चर्चेचं गुऱ्हाळ संपलं; शेवटी 'मविआ'चे जागावाटप ठरलं; काँग्रेस, शिवसेना (UBT), NCP (SS) कसे लढणार? घ्या जाणून)
समीर भुजबळ विरुद्ध सुहास कांदे
निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया जाहीर केल आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. जो संपला आहे. त्यामुळे आता यापुढे कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. आता दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होईल आणि बाद झालेले अर्ज रद्द केले जातील. उर्वरी अर्ज निवडणूक लढविण्यासाठी पात्र उमेदवार म्हणून गृहीत धरले जातील. दरम्यान, ज्या उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे आहेत त्यांच्यासाठीही काही कालावधी राखून ठेवण्यात आला आहे. निश्चित मुदतीत उमेदवारी अर्ज काढून घेतल्यानंर राहीलेले अर्ज हे निवडणुकीतील उमेदवार म्हणून पात्र असणार आहेत. ज्यांच्यासाठी संबंधित मतदारसंघातील मतदार मतदान करतील.