Guidelines For Use Of Firecrackers: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रात्री 10 वाजेपर्यंत फटाके फोडता येणार; फटाक्यांच्या वापरासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन महानगरपालिकेने निवेदनाद्वारे केले आहे.

Representational Image (File Photo)

Guidelines For Use Of Firecrackers: वायू प्रदूषणाच्या (Air Pollution) वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिवाळी दरम्यान फटाक्यांच्या (Firecrackers) वापरासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी केली आहेत. बीएमसीने फटाक्यांच्या वापरावर निर्बंध घातले असून शहरातील वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. रात्री 10 नंतर फटाके फोडण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. तसेच नागरिकांनी फटाक्याचा वापर कमीत कमी करण्याचे आवाहन केले आहे. याव्यतिरिक्त, बीएमसीने लोकांना फक्त मोकळ्या जागेतच फटाके फोडण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

देशाची राजधानी तसेच इतर ठिकाणी प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. याशिवाय, मुंबईच्या हवेची गुणवत्ताही लक्षणीयरीत्या खालावली आहे. दिवाळीच्या सणानिमित्त लोक फटाके फोडतात, ज्यामुळे मोठ्याप्रमाणात वायू प्रदूषण होते. हवेतील प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी फटाके कमी प्रमाणात फोडावेत, असं आवाहन महानगरपालिकेने केलं आहे. (हेही वाचा - Firecracker Ban in Delhi: अरविंद केजरीवाल सरकारचा प्रदुषण रोखण्यासाठी मोठा निर्णय; शहरात जानेवारीपर्यंत फटाक्यांची विक्री, साठवणूक, उत्पादन आणि वापरावर बंदी)

फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध आणि दम्याचा त्रास असलेल्या लोकांना मोठा त्रास होत आहे. आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन महानगरपालिकेने निवेदनाद्वारे केले आहे. (हेही वाचा - Explosion In Illegal Firecracker Factory At Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 14 जण जखमी)

मुंबईत फटाक्यांच्या वापरासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे -

फटाके फोडताना अनेकदा आगीच्या घटना घडतात. त्यामुळे फटाके फोडताना सुरक्षिततेला प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फटाके फोडताना सुती कपडे घाला, पाण्याची बादली किंवा वाळू जवळ ठेवा.