Amol Kolhe Injured: प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याबाबत अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. अमोल कोल्हे शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगादरम्यान घोड्यावरून एन्ट्री करताना जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल असून सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, शिवपुत्र संभाजी महानाट्याचे पुढील प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसा, घोड्यावरून एन्ट्री करताना अमोल कोल्हे यांच्या पाठीला दुखापत झाली. नाटकाच्या प्रयोगादरम्यान घोड्यावरुन एन्ट्री घेताना घोड्याचा मागील पाय अचानक दुमडला. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या पाठीला जर्क बसला. परिणामी त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. पाठीला दुखापत झाली असतानाही अमोल कोल्हे यांनी प्रयोग सादर केला. परंतु, डॉक्टरांनी कोल्हे यांना विश्रांती सल्ला दिला आहे. (हेही वाचा -Maharashtra Foundation Day 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली (Watch Video))
तथापी, महाराष्ट्र दिनानिमित्त आज कराड येथे ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा प्रयोग सादर होणार आहे. पाठीला दुखापत झाली असतानादेखील अमोल कोल्हे आज कल्याणी मैदानात महानाट्याचा प्रयोग करणार आहेत. परंतु, अभिनेत्याचे उर्वरित दोन प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान, मणक्याला जर्क बसल्याने अमोल कोल्हे यांना पाठीत तीव्र वेदना जाणवत आहेत. आजचा प्रयोग संपल्यानंतर अमोल कोल्हे मुंबईत जाऊन उपचार घेणार आहेत. तसेच उपचार घेऊन पिंपरी चिंचवड येथील एच. ए. मैदानावर 11 ते 16 मे कालावधीत होणारे शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग ठरल्याप्रमाणे होणार, असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे.