Amit Shah | | (Photo Credits: Facebook)

Nanded Lok Sabha Constituency: कर्नाटक राज्यात झालेल्या दारुन पराभवामुळे भारतीय जनता पक्ष (BJP) खडबडून जागा झाला आहे. आगामी लोकसभा जिंकायच्या असतील तर तळागाळात जाऊन काम करावे लागेल. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरायला पाहिजे हे भाजप नेतृत्वाला कळले आहे. त्यामुळेच 'मोदी @ 9' मोहिमेद्वारे भाजप सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे केंद्रीय नेतृत्व, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात येत्या 10 जूनर रोजी ते नांदेड येथे सभा (Amit Shah's Rally in Nanded) घेणार आहेत.

नांदेड हा अशोक चव्हाण (Ashok Chavan) पर्यायाने काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे काँग्रेच्याच बालेकिल्ल्यात काँग्रेसला आव्हान दिले की, इतर ठिकाणी आपण काँग्रेसचा धुव्वा उढवू शकतो, अशी भाजपची रणनिती असू शकते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनिती काय? याबाबतही कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळातही उत्सुकता आहे. (हेही वाचा, BJP On Shiv Sena: 'शिवसेना खासदार गद्दार, खोकेबहाद्दर', भाजप पदाधिकाऱ्याच्या आरोपाने युतीत तणाव, एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप प्रणीत एनडीए सरकारला 30 मे रोजी नऊ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने पाठिमागच्या नऊ वर्षांमध्ये केंद्र सरकारने घेतलेले निर्णय, भूमिका आणि विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपने विशेष जनसंपर्क अभियान राबवले आहे. या अभियानाला मोदी @9 विशेष जनसंपर्क अभियान असे नावही देण्यात आले आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते नांदेड येथे सभा घेणार आहेत. दरम्यान, सोमवारी ते सभेपूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. ही बैठक शासकीय विश्रामगृहावर पार पडेल, अशी माहती आहे. (हेही वाचा, Bhavana Gawali: बंधू नरेंद्र मोदी येणार मदतीला? बहीणील शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार फिल्डिंग)

मोदी @9 विशेष जनसंपर्क अभियान हे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. त्यामुळे हे अभियान जिल्हा,मंडळ शक्ती केंद्र व बूथ पातळीवर विविध कार्यक्रम घेऊन तळागाळात पोहोचविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. हे अभियान येशस्वी करण्यासाठी केंद्रीय मंत्री, भाजपचे सर्व वरिष्ठ मंत्री यांच्याावर जबाबादारी सोपविण्यात आली आहे. शिवाय देशपातळीवर प्रत्येक मंत्र्याला प्रत्येकी दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार अमित शाह हे येत्या 10 जूनला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून ते नांदेड येथे सभा घेत आहेत. भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य चैतन्य बापू देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे.