कलम 370 हटवून देश एक केला; भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारात जम्मू-काश्मीर मुद्द्याचा समावेश
Pankaja Munde,Amit Shah in Bhagwangad Dussehra Melava Beed | (Photo Credits: Twitter)

Maharashtra Assembly Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीर राज्यातून कलम 370 (Article 370) हटवले आणि देश एक केला, असे सांगत आज (8 ऑक्टोबर 2019) गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत (Maharashtra Assembly Elections) जम्मू-काश्मीरचा विषय दाखल केला. पंकजा मुंडे (Pankaja Munde) आयोजित भगवान बाबा (Bhagwangad Dussehra Melava) दसरा मेळावा सावरगाव येथे भाजप अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते. या वेळी उपस्थित जनसमुदयासमोर बोलताना अमित शाह यांनी केंद्र सरकार, गोपिनाथ मुंडे, फडणवीस सरकार आणि पंकजा मुंडे यांच्या कामाचे कौतुक केले.

या वेळी बोलताना अमित शाह म्हणाले, भगवान बाबांनी समाजाला दिशा दिली. त्यांच्या शिकवणीवर समाजाने प्रगती केली. गोपीनाथ मुंडे यांनीही मोठे कार्य केले. त्यांनी दाखवलेल्या दिशेनेच आज पंकजाताई काम करत आहेत, असे कोतुकोद्गार अमित शाह यांनी काढले. दरम्यान, या वेळी जनतेने केंद्रात भाजपला 300 जागा दिल्यानेच 370 कलम हटवता आले आणि देश एक करण्यात आला, असेही शाह यांनी या वेळी सांगितले.

पंकजा मुंडे आयोजित भगवान बाबा दसरा मेळावा सावरगाव येथे भाजप अध्यक्ष अमित शाह हेलिकॉप्टरने दाखल झाले. या वेळी शाह यांच्या स्वागतार्थ 370 तोफांची सलामी देण्यात आली. तसेच, उपस्थित नागरिकांमधून अमित शाह यांना 370 तिरंगे झेंडे दाखवण्यात आले. (हेही वाचा, Dussehra 2019: महाराष्ट्रात आज 'या' 3 ठिकाणी दसरा मेळाव्याचे आयोजन; मोहन भागवत, उद्धव ठाकरे आणि अमित शहा काय बोलणार याकडे लक्ष)

पंकजा मुंडे ट्विट

या वेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, गोपिनाथ मुंडे यांनी आपल्या हाडाची काढं करुन समाजसेवा केली. त्यांनी दाखवलेला मार्ग आयुष्यभर सोडणार नाही. मुंडे साहेबांनी उसतोड कामगारांसाठी आयुष्य वेचले. आज ही गर्दी दिसते आहे ती त्यांच्याचमुळे. हीच गर्दी भविष्य बदलणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपला विश्वास कायम ठेवणार, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तसेच, माझ्या कार्याला पक्षनेतृत्वाकडूनही आशीर्वाद मिळाल्याचे पंकजा मुंडे यांनी या वेळी सांगितले.