अमेरिका आणि ईराण या देशांमधील सध्याच्या तणावग्रस्त संबंधांचा परिणाम आता भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. आज (6 जानेवरी) शेअर बाजार उघडताच सेंसेक्स अअणि निफ्टी दोन्ही कोसळल्याचं चित्र आहे. सध्या चाळीशीपार गेलेला सेन्सेक्स आज 366 अंकांनी कोसळला तर निफ्टी मध्येही 150 अंकांची पडझड पहायला मिळाली आहे. आज सेन्सेक्स 41,097.69 वर पोहचला आहे. बगदाद हल्ल्यानंतर जगभरात त्याचे पडसाद पहायला मिळाले आहेत. दरम्यान याचा परिणाम सोन्याच्या भावांवर देखील होणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. तर भारताचा रूपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 72.08 वर पोहचला आहे.
शेअर बाजार कोसळत असल्याने अनेक गुंतवणूकदार आपली गुंतवणूक सोन्यामध्ये करत आहेत. सोन्याचे भावदेखील आता 40 शी पार गेला आहे. सध्या सोन्याच्या भावदेखील सध्या 41010 प्रति तोळा ( 10 ग्राम) च्या आसपास पोहचला आहे. (हेही वाचा - अमेरिका आणि इराण मधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोनं 45 हजारांवर जाण्याची शक्यता).
ANI Tweet
Sensex at 41,097.69, down by 366.92 points pic.twitter.com/fwFF5lrL7u
— ANI (@ANI) January 6, 2020
अमेरिकेने गुरुवारी (2 जानेवारी) रात्री इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी याचा रॉकेट हल्ल्यात खात्मा केला होता. त्यानंतर पुन्हा शनिवारी (4 जानेवारी) अमेरिकेने हवाई हल्ला केला होता. यात 6 जण ठार झाले होते. या हल्ल्याला प्रतित्युत्तर देण्यासाठी इराणने रात्री उशिरा अमेरिकेच्या सैन्यतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. याचा परिणाम आता मुंबई शेअर बाजारावरही दिसत आहे.