Ambernath: बेपत्ता पत्नीचा शोध घेत पोहोचला मित्राच्या रुमवर; दरवाजा उघडताच दोघांना 'अशा' अवस्थेत पाहून पतीलाही बसला धक्का
Image For Representation (Photo Credit: Pixabay)

बेपत्ता पत्नीचा शोध घेत मित्राच्या रुमवर पोहचलेल्या पतीला मोठा धक्का बसला आहे. मित्राच्या रुमचा दरवाजा उघडल्यानंतर पतीला मित्रासह त्याच्या पत्नीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनंतर अंबरनाथ (Ambernath) परिसरात एकच खळबळ माजली होती. संबंधित व्यक्तीची पत्नी 17 नोव्हेंबरपासून बेपत्ता झाली होती. याबाबत त्याने शिवाजी नगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अजित शाह असे तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अजित यांची पत्नी आणि त्यांचा मित्र यांच्यात शारीरिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

अजित आणि संदीप सक्सेना अंबरनाथ येथील एकाच कंपनीत कामाला होते. दरम्यान, संदीप हे नियमितपणे अजितच्या घरी येत जात असे. त्यामुळे अजित यांच्या पत्नी जयंती यांचे सक्सेना यांच्यासोबत मित्रत्वाचे संबंध होते. एवढेच नव्हेतर, सक्सेना आणि आपली पत्नी जयंतीमध्ये शारीरिक संबध असल्याची माहिती अजित यांनी पोलिसांना दिली आहे. मात्र, 17 नोव्हेंबरपासून जयंती बेपत्ता झाल्यानंतर अजित यांनी संदीपला फोन केला. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळल्याने अजित संदीप यांच्या अंबरनाथ येथील फ्लॅटमध्ये पोहचले. त्यांनी दरवाज्याची बेल वाजवली. परंतु कोणीही दरवाजा उघडला नाही. दरम्यान, थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर अजित आतमध्ये गेले. त्यावेळी अजित यांना जयंती आणि संदीप यांचे मृतदेह आढळून आले, अशी माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Nalasopara Suicide: खळबळजनक! लग्नाला 2 वर्षही झाले नाहीत अन् एका दाम्पत्याची गळफास लावून आत्महत्या; नालासोपारा येथील घटना

शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप यांनी स्टोन ग्राईंडरच्या मदतीने स्वतःचा गळा चिरलेला होता. संदीपने आधी जयंती यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाजावरून पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, संदीप याने जयंती यांची हत्या करून स्वत:ही आत्महत्या का केली? असाही प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे.