अमरावती विधानसभा मतदारसंघ (Photo Credits-File Image)

महाराष्ट्राच्या विदर्भातील अमरावती हा जिल्हा सर्वाधिक लोकवस्ती असणारा शहरी भाग आहे. तर अमरावती मतदारसंघाचा 38 वा क्रमांक लागतो. यामध्ये एकूण 8 मतदारसंघ येत असून अमरावती हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असल्याचे म्हटले जाते. 1962 पासून आतापर्यंत 9 वेळा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना येथून विजय मिळाला आणि भाजपला तीन वेळा या मतदारसंघात आपली सत्ता स्थापन करता आली आहे. अमरावती मध्ये त्यानुसार मोर्शी, धामणगांव,अचलपूर, मेळघाट, दर्यापूर, तिवसा, अमरावती, बडनेरा अशी मतदारसंघांनी नावे आहेत. यंदा कोणाची सत्ता अमरावतीत प्रस्थापित होणार हे उत्सुकतेचे ठरणार आहे.

-अमरावती विधानसभा मतदारसंघ क्रमांक 38

अमरावती जिल्ह्यात शिक्षणाच्या चांगल्या सुविधा असल्या, तरी मेळघाट आदिवासी भागात आदिवासींना शिक्षणाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. जिल्ह्यात शेती आणि शेतमजुरी हेच रोजगार मिळविण्याचे साधन आहे. तर या मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार डॉ. सुनील देशमुख आहेत. 2014 मध्ये देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसचे रावसाहेब खेशावत यांना 48,961 मतांनी पराभव झाला होता. यंदा अमरावती विधानसभा मतदारसंघातून पुन्हा भाजपने सुनिल देशमुख यांना तिकिट दिले असून त्यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सुलभा खोडके यांना रिंगणात उतरवले आहे.

-तिवसा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 39

तिवसा हा अमरावती लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. या मतदारसंघाचे अॅड यशोमती ठाकूर काँग्रेसच्या विद्यमान खासदार आहेत. तर 2014 मध्ये यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजपच्या निवेदिता चौधरी यांचा 38,367 मतांनी पराभव झाला होता. यंदाच्या निवडणूकीसाठी तिवसा मतदारसंघातून पुन्हा यशोमती ठाकूर यांना काँग्रेसने तिकिट दिले आहे.

-दर्यापूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 40 

अमरावती मधील लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी दर्यापूर हा एक आहे. हे शहर चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले आहे. सध्या येथे भाजपचे रमेश बुंदिले विद्यमान आमदार आहे. 2014 मध्ये बुंदिले यांच्या विरोधात रिपाईच्या बळवंत वानखेडे यांचा 44,642 मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. तर यंदाच्या विधानसभा निवडणूकीसाठी पुन्हा बुंदिले यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधा काँग्रेसचे वळवंत वानखेडे यांना तिकिट देण्यात आले आहे.

-बडनेरा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 37

बडनेरा विधानसभा मतदारसंघातून प्रथमच काँग्रेसचे पुरुषोत्तम देशमुख यांना विजय मिळाला होता. या मतदारसंघात सर्वाधिक काँग्रेसची सत्ता राहिली आहे. त्यानंतर शिवसेनेची सत्ता स्थापन झाली. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत रवी राणा यांचा विजय झाला होता. तर राणा यांच्या विरोधात सुलभा खोडके यांचा 33,897 मतांनी पराभव झाला. मात्र यावेळी निवडणूकीसाठी शिवसेनेच्या प्रीती संजय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.