मुंबईमध्ये मद्याच्या विक्रीमध्ये गतवर्षात घट (Alcohol Sales Drop in Mumbai City) झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Tax Department) मुंबई शाखेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये 'बिअर' आणि 'वाईन' च्या विक्रीमध्ये मुंबईत 5.18 टक्के आणि 5.31 टक्के इतकी घट झाली आहे. विशेष म्हणजे या विक्रीमध्ये घट झाल्याने महसूल विभागाला (Revenue Department) मोठा तोटा झाला आहे. मुंबईमध्ये मद्याच्या विक्रीत घट झाल्याने महसूल विभागाच्या उत्पन्नात 5 टक्क्यांची घट झाली आहे.
मुंबईकरांनी 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत एकूण 1.41 कोटी लिटर बिअर प्यायली. हा आकडा 2018 मधील याच कालावधीतील आकडेवारीच्या 7.70 लाख लिटरने कमी आहे. मागील वर्षी व्हिस्कीच्या विक्रीमध्ये 1.02 इतकी किरकोळ घट झाली आहे. तसेच देशी बनावटीच्या मद्याच्या विक्रीत 0.53 टक्क्यांची किरकोळ घट झाली आहे. याबाबत 'हिंदुस्तान टाईम्स' या इंग्रजी दैनिकाने वृत्त दिलं आहे. (हेही वाचा - प्रमाणात घेतलेल्या बिअरचे काही आश्चर्यचकित करणारे फायदे)
मुंबईतील नागरिकांचे सुटीनिमित्त बाहेरगावी जाऊन आनंद साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेही मुंबईतील मद्यविक्रीत घट झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच बिअरच्या किंमतींमध्येही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ही घट झाली असल्याचे राज्य उत्पादन शुक्ल विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.