
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज कर्जत जामखेड (Karjat Jamkhed) मतदारसंघातील एका सभेत बोलत होते, यावेळी कामाच्या बाबत दिरंगाई करणाऱ्या, चिरीमिरीच्या नादात भ्रष्टाचार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना संबोधून त्यांनी "माझी सटकली तर तुमची वाट लागेल" अशा कठोर शब्दात दम भरला आहे. एकदा रास्ता बांधून झालं आणि तो लगेच येत्या पावसाळ्यात खराब झाला तर त्या कॉन्ट्रॅक्टर सहित सर्वांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले जाईल असाही इशारा या सभेत अजित पवार यांनी दिला आहे. कर्जत जामखेड हा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचा विजेता मतदार संघ आहे त्यामुळे इथल्या सभेत बोलत असताना अजित पवार यांनी सर्व नागरिकांचे रोहित यांना निवडून देण्यासाठीही आभार मानले, तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवलात ते नाणं खणखणीत आहे, आम्ही ते वाजवणारच काळजी करू नका असा विश्वास सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. ठाकरे सरकारने 100 दिवसांत काय केलं? पहा सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा 111 सेकंदात 'हा' व्हिडिओ
तर दुसरीकडे, महिला अत्याचाराच्या संदर्भात राज्य सरकार कठोर कायदा आणायच्या तयारीत आहे, कुठल्याही व्यक्तीची कोणाच्याही आई बहिणीकडे नजर वाकडी करून पाहण्याची हिमंत सुद्धा होता कामा नये असे आमचे ध्येय आहे, त्यामुळे तक्रार आल्यास पोलिसांनी थेट कारवाई करावी इथे कोणाचीही दडपशाही चालणार नाही असेही अजित पवार यांनी ठामपणे सांगतले. (हे ही वाचा-मनसेचे शॅडो कॅबिनेट जाहीर: जाणून घ्या अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर, शालिनी ठाकरे, अनिल शिदोरे आदी नेत्यांकडे कोणती जबाबदारी)
दरम्यान, देशभरात सुरु असणाऱ्या सीएए विरुद्ध कायद्यावर बोलत असताना अजित पवार यांनी नागरिकांना दिलासा देत, काळजी करू नका, राज्यातील एकहि नागरिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे आश्वासन दिले आहे. जोपर्यंत सरकारमध्ये आहे तोपर्यंत महाराष्ट्रातील एकाही नागरिकाला त्रास होऊ देणार नाही असेही अजित पवार यांनी बोलताना सांगितले.