मनसेचे शॅडो कॅबिनेट जाहीर: जाणून घ्या अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर, शालिनी ठाकरे, अनिल शिदोरे आदी नेत्यांकडे कोणती जबाबदारी
MNS Leader Raj Thackeray (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) 14 वा वर्धापन दिन आज नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. यावर्षी पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन सोहळा मुंबई बाहेर पार पडला. या कार्यक्रमात मनसे नेते अनिल शिदोरे (Anil Shidore) यांच्याकडून शॅडो कॅबिनेटमधील (Shadow Cabinet) नेत्यांची घोषणा करण्यात आली. यात मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर, शालिनी ठाकरे, अनिल शिदोरे आदी नेत्यांकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या एप्रिलमध्ये नवी मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करुन आपला भगवा झेंडा राज्यभर नेऊया, असं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. तसेच पक्षातील पदाधिकाऱ्याव्यतिरिक्त कोणाला मंत्रीमंडळात सहभागी व्होयचं असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, असं आवाहनही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे.

आज सकाळी 10 वाजता वाशी टोलनाक्यावरून मनसे नेते अमित ठाकरे यांची रॅली निघाली होती. राज ठाकरे या वर्धापन दिन सोहळ्यात नेमकं काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. मनसेने आपल्या झेंड्याचा रंग बदलल्यानंतर आता नवी मुंबईतील महापालिका निवडणूकही रंगणार आहे. आज झालेल्या वर्धापन दिन सोहळ्यात मनसेच्या शॅडो कॅबिनेट मंत्रीमंडळाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या मंत्रीमंडळात कोणत्या नेत्याकडे कोणती महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे जाणून घेण्यासाठी खालील यादी वाचा... (हेही वाचा - सरकारचे वाभाडे काढण्यासाठी हे शॅडो कॅबिनेट, पण चांगल्या कामाचं कौतुकही करायचं - राज ठाकरे)

मनसे शॅडो कॅबिनेट मंत्रीमंडळाची यादी - 

बाळा नांदगावकर : गृह

नितीन सरदेसाई : अर्थ

ग्रामविकास : जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे, प्रकाश भोईर,

आपत्ती मदत – संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिष सारस्वत, संचोष धूरी, ललित यावलकर

शालेय – अभिजीत पानसे, अदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर आणि अमोल रोगो

कामगार – राजेंद्र वागस्कर, गजानन राणे, सुरेंद्र सुर्वे

नगरविकास – संदिप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुणकर, किर्ती शिंदे, हेमंत कदम, संदिप

कुलकर्णी, फारूक डाळा

सार्वजनिक आरोग्य – रिटा गुप्ता

सहकार – कोस्तूप लिमये, वल्लभ चितळे

अन्न व नागरी पुरवठा – महेश जाधव, विशाल पिंगळे

मत्सविकास – परशुराम ऊपरकर, निशांत गायकवाड

महिला बालविकास – शालिनी ठाकरे

सार्वजनिक बांधकाम – सामाताई शिवलकर,सॅजय शिरोडकर,

रोजगार हमी- बाळा शेंडगे, आषिश पूरी, सास्कृतिक कार्य – अमेय खोपकर, कृषी – संजीव पाखरे, अजय कदम,

कौशल्य विकैस – स्नेहल जाधव

भटक्या विमुक्त जाती – गजानन काळे,

ग्राहक संरक्षण – प्रमोद पाटिल,

आदिवासी विकास – आनंद एमबडवाड, किशोर जाचक, परेश चौधरी,

पर्यावरण – रुपाली पाटिल, किर्तीकुमार शिंदे, देवव्रत पाचिल,

खारजमिन भुकंप पुनर्वसन – अमिता माझगावकर,

क्रिडा – विठ्ठल लोकणकर,

अल्पसंख्याक निकैस – अल्ताफ खान, जावेद तडवी

सरकारचे वाभाडे काढण्यासाठी हे शॅडो कॅबिनेट स्थापन करण्यात आलं आहे. परंतु, सरकारच्या चांगल्या कामाचं कौतुकही करायचं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मनसेने अनेक चढ-उतार पाहिले. मात्र या सर्व क्षणी तुम्ही पक्षाच्या पाठिशी उभं राहिलातं, असंही राज ठाकरे म्हणाले. पक्षातील पदाधिकाऱ्याव्यतिरिक्त कोणाला मंत्रीमंडळात सहभागी व्होयचं असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे.