Ajit Pawar On Fractured Freedom | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

फॅक्चर्ड फ्रिडम (Fractured Freedom) पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार आयद्या वेळी रद्द करण्यावरुन राज्यात सुरु झालेल्या वादावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सडेतोड भाष्य केले केले आहे. राज्य सरकारने साहित्याच्या क्षेत्रात लुडबूड करु नये. एखादी समिती जेव्हा एखादा निर्णय घेते तर तो निर्णय त्यांनी अभ्यासाअंतीच घेतलेला असतो. असे असताना फॅक्चर्ड फ्रिडम पुस्तकाला मिळालेला पुरस्कार रद्द करणे म्हणजे आणीबाणी लादण्याचा प्रयत्नच असल्याचे अजित पवार (Ajit Pawar On Award Wapsi) यांनी म्हटले आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार यांनी म्हटले की, लोकशाहीमध्ये सर्वांनाअधिकार असतो. नागरिकांना आंदोलन करण्याचा, आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार त्यांना घटनेने दिला आहे. असे असताना एखाद्याच्या विचारांवरच बंधणं आणणं योग्य नाही.

पुढे बोलतान अजित पवार यांनी म्हटले की, एखाद्या पुस्तकाला पुरस्कार जाहीर होतो आणि राज्य सरकार पुन्हा हा पुरस्कार रद्द करते हे खरोखरच सरकारसाठी लाजीरवाणे आहे. महत्त्वाचे म्हणजे पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द केल्याने अनेक लेखक कलावंतांनी आपला पुरस्कार परत करण्याचा किंवा जाहीर झालेला पुरस्कारच न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाआहे. ही बाब राज्याची प्रतिमा आणि राज्य सरकारसाठी अतिशय लाजीरवाणी आहे, असेही अजित पवार म्हणाले.

'फॅक्चर्ड फ्रिडम' आणि वाद

कोबाद गांधी हे 'फॅक्चर्ड फ्रिडम' या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत. मूळ पुस्तक इंग्रजी भाषेत असन अनघा लेले यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. साधारणपणे सत्तरीच्या दशकात सामाजिक उपेक्षितांचे जीने वाट्याला आल्याने आणि शोषितांना न्याय मिळवून देण्याची भावना मनात बळावल्याने अनेक तरुणांनी नक्षलवादी चळवळींमध्ये सहभाग घेतला. यात शिक्षित तरुणांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होता. 'फॅक्चर्ड फ्रिडम' पुस्तकाचे लेखक कोबाद गांधी हेसुद्धा अशा तरुणांपैकीच एक. या चळवळीसाठी त्यांनी काही काळ काम केल्यावर ते भाकप (माओवादी) या पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य बनले. या पक्षावर सध्या बंदी आहे. त्यांच्या पत्नी दिवंगत पत्नी अनुराधा गांधी या देखील जंगलात चळवळीत सक्रीय होत्या असे सांगितले जाते. दरम्यान, नक्षलवादी चळवळींशी संबंध असल्याच्या कारणावरुन कोबाद गांधी यांना 17 सप्टेंबर 2009 मध्ये अटक करण्यात आली. तुरुंगात असताना त्यांनी आपल्या अनुभवांवर एक पुस्तक लिहीले. ते पुस्तक म्हणजे 'फॅक्चर्ड फ्रिडम' याच पुस्तकावरुन सध्या महाराष्ट्रात वाद सुरु आहे.