राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे मेहुणे अमरसिंह बाजीराव पाटील (Amarsinh Patil ) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन (Passed Away) झाले आहे. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली आहे. शनिवारी पहाटे पुण्यात अमरसिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. अमरसिंह बाजीराव पाटील हे ‘बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क’च्या (Baramati Hitech Textile Park Ltd) अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे धाकटे बंधू होते.
अमरसिंह पाटील यांच्या पार्थिवावर उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील तेर (Ter) या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अमरसिंह पाटील यांनी तेर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही काही काळ काम पाहिलं होतं. एक व्यासंगी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून अमरसिंह पाटील यांचा परिचय होता. (वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार - संजय राऊत)
अमरसिंह पाटील हे व्यासंगी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. तेर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिलं होतं. शेती हा त्यांच्या आवडीचा विषय होता. त्यांनी काही काळ शेतीपुरक व्यवसायदेखील केला होता. शेती, राजकारणाबरोबरचं त्यांना वाचनाचीही आवड होती.