Airtel network down in Kalyan-Dombivali? नेटवर्क सबस्क्रायबर्सच्या ट्वीटर वर तक्रारी
Airtel posters. (Photo Credit: PTI)

मुंबई नजिक कल्याण, डोंबिवली भागात आज एअरटेलचं नेटवर्क (Airtel Network) विस्कळीत झालं आहे. दरम्यान एअरटेल सबस्क्रायबर्सनी ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या तक्रारी नोंदवत राग व्यक्त केला आहे. दरम्यान ट्वीटर वर युजर्सनी केलेल्या तक्रारीनुसार डोंबिवली पूर्व (Dombivali East) डोंबिवली पश्चिम (Dombivali West) भागात दोन्ही ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नाही. आज दुपारी अंदाजे 3.15 पासून ही अशीच स्थिती आहे. डोंबिवली सोबतच कल्याण आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये असलेल्या भागात जे डोंबिवलीच्या जवळ आहेत तेथे देखील एअरटेलचं नेटवर्क गडबडल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान ट्वीटर या सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर आपल्या तक्रारी करताना युजर्सनी नेटवर्क नसल्याने त्रास होत असल्याचं सांगत तातडीने दुरूस्ती करण्याचं आवाहन केले आहे.

भारतातील 3 आघाडीच्या नेटवर्क मध्ये एअरटेलचा समावेश होतो. अन्य दोघांमध्ये रिलायंस जिओ आणि व्होडाफोन- आयडीया आहे. सध्या प्रीपेड आणि पोस्ट पेडमध्ये अधिकाधिक ग्राहक खेचण्याकडे या सार्‍यांची एकमेकांविरूद्ध स्पर्धा सुरू आहे.