Asaduddin Owaisi l (Photo Credits: Facebook)

मुस्लिमांना धर्मनिरपेक्षता (Secularism) शिकवली जाते. आजवर राजकीय सेक्युलॅरिजमने मुस्लिमांना अश्वासनांपलिकडे काय दिले? आजव राजकीय सेक्युलॅरिजमने मुस्लिमांचे जेवढे नुकसान केले तेवढे नुकसान दुसऱ्या कोणीही केले नाही. सेक्युलॅरिजमने मुस्लिम आरक्षण (Muslim Reservation) दिले का? अशा धर्मनिरपेक्षतेला मी मानत नाही. सेक्युलॅरिजमने आपल्याला काय दिले? माझा केवळ घटनेने दिलेल्या धर्मनिरपेक्षतेवरच विश्वास आहे. मी केवळ घटनेतील धर्मनिरपेक्षतेलाच मानतो. आणखी किती काळ विश्वासघात सहन करत राहणार? असा सवाल त एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी उपस्थित केला. ते मुंबई येथील चांदिवली येथे आयोजित सभेत (AIMIM Rally In Mumbai) बोलत होते.

एकत्र येऊन काम केले तर एआयएमआयएम महाराष्ट्राच्या कोना कोपऱ्यात पोहोचेन. आजची सभा ही राजकीय नाही. मुस्लिम आरक्षणासाठी आहे. सरकारला अडचण काय आहे. शिवसेना हा पक्ष तर चोवीस तास राष्ट्रवदाचा जप करतो. तरीही एआयएमआयएमच्या रॅलीला तिरंगा काढण्यास पोलीस सांगतात. घृणा इतकी पसरली आहे की, मुस्लिम अथवा दलित यांनी तिरंगा पकडला तरीही विरोध केला जातो. हे सरकार तिरंग्याच्या विरोधात झाले आहे याची खंत वाटते, असे म्हणत एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. (हेही वाचा, AIMIM Rally In Mumbai: मुस्लिम आरक्षण राजकीय कार्यक्रम नव्हे, हक्काची लढाई- इम्तियाज जलील)

एमआयएमची सभा म्हटले की मुंबईमध्ये जमावबंदी लावली जाते. पण, आगामी काळात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. त्या वेळी जमावबंदी लावाल का? असा सवाल असदुद्दीन अवैसी यांनी उपस्थित केला. मुस्लिमांना धोका शिवसेना, भाजपकडून नाही. मुस्लिमांना खरा धोका काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आहे. कारण, शिवसेना, भाजप सुरुवातीपासूनच मुस्लिम विरोधी आहेत. मात्र, जे मुस्लिम काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले त्यांना काय मिळाले, असेही अवैसी म्हणाले.

व्हिडिओ

आज महाराष्ट्रातील मुस्लिमांची आवस्था काय आहे. किती मुसलमान लोक ग्रॅज्युएट झाले. हा सवाल स्वत:ला विचारा. आज मुसलमान शिकू इच्छितो. पण आज मुस्लिम आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही. किती काळ विश्वासघात सहन करत राहणार? असा सवाल विचारत सर्वांनी एकत्र या. शिक्षणाबाबत चर्चा करा. एकजुटीची चर्चा करा असेही अवैसी म्हणाले.