'मुंबई येथे अखेर मी आलोच. त्यांना वाटत होते की, सरकार माझे आहे. मी काहीही करु शकतो. मी म्हणत होतो जनता माझ्यासोबत आहे मी काहीही करु शकतो. मी मुंबईमध्ये येऊ नये यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. पण अखेर मी मुंबईत आलोच', असे म्हणत एमआयएम (AIMIM ) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी निशाणा साधला. मुंबई येथील असदुद्दीन औवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या चांदीवली येथील सभेतून ते बोलत होते. इम्तियाज जलील यांनी एमआयएमच्या व्यासपीठावरुन मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा छेडला. आम्ही आमच्यासाठी नाही तर आमच्या हक्कासाठी आरक्षणाची लढाई लढतो आहोत, असेही ते म्हणाले.
'मुस्लिम आरक्षण' मिळविण्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांनी 'मराठा' बांधवांप्रमाणे एकत्र आले पाहिजे. मराठा आरक्षणाच्या मागणिसाठी निघालेल्या मोर्चात सर्व पक्षाचे मराठा बांधव एकत्र झाले. या बांधवांनी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी असे काहीच पाहिले नाही. केवळ आरक्षणाच्या मुद्द्यासाठी हे सर्व लोक एकत्र आले. त्याच पद्धतीने मुस्लिम बांधवांनी एकत्र यावे आणि एकमुखाने आरक्षणाची मागणी करावी, अशी मागणीही इम्तियाज जलील यांनी केली. (हेही वाचा, AIMIM Rally In Mumbai: एमआयएमची रॅली मुंबईमध्ये दाखल, महत्त्वाच्या अपडेट्स)
इम्तियाज जलील यांनी सांगितले की, मुस्लिम आरक्षण हा आमचा राजकीय कार्यक्रम नाही. ही आमची हक्काची लढाई आहे. ही लढाई आम्ही लढत राहणार आजवर मुस्लिम समाजाचा केवळ वापर झाला. पण हीच वेळ आहे. आपल्या हक्कासाठी उभे राहण्याची. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. हे लोक मते मागण्यासाठी आपल्या दारात येतील. त्यांना विचारा मुस्लिम वक्फ बोर्डाच्या जमीनी कोणी लाटल्या?कुठे आहे वक्फ बोर्डाची 93 हजार एकर जमीन? या जमिनी लाटणाऱ्यांवर पाठिमागील आठ महिन्यात नऊ एफआय आर दाखल केले आहेत.