AIMIM Rally In Mumbai: एमआयएमची रॅली मुंबईमध्ये दाखल, महत्त्वाच्या अपडेट्स
Imtiaz Jaleel | (Photo Credits: Facebook)

एमआयएमचे (AIMIM ) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या मुंबईत होणाऱ्या सभेबाबत जोरदार चर्चा आहे. दरम्यान, एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथून निघालेली एक रॅली मुंबईपर्यंत ( Aurangabad to Mumbai) पोहोचली आहे. ही रॅली मानखूर्द येथे दाखल झाली असून पुढे निघाली आहे. असदुद्दीन ओवैसी यांची सभा आणि शहरातील अमायक्रॉन स्ट्रेनचा वाढता धोका या पर्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांची रॅली (AMIM Rally) नवी मुंबई येथेच अडविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा केली आणि ही रॅली पुढे सोडण्यात आली.

  • मुंबई पोलिसांनी ओमायक्रॉनचा धोका विचारात घेऊन जाहीर रॅली, सभांना बंदी करण्यात आली आहे. तसेच, जमावबंदी आदेशही लागू केले आहेत. दरम्यान, एममआयएम रॅली मुंबई बाहेर रोखण्यासाठी पोलीसांनी मुंबईच्या वेशीवर बॅरिकेडींग केलं होतं. (हेही वाचा, Asaduddin Owaisi Rally in Mumbai: असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेबाबत अनिश्चितता कायम; इम्तियाज जलील म्हणाले 'राष्ट्रवादीला MIM चा धोका असल्यानेच नाकारली परवानगी')
  • इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पोलिसांनी आम्हाला मुंबईत जाण्यास परवानगी दिली. मात्र, आमच्या वाहनावर असलेला तिरंगी झेंडा काढण्यास सांगितले. आम्ही तिरंगा झेंडा काढण्यास नकार दिला. आम्हाला अटक करा किंवा आमच्या गाड्या अडवा. आम्ही मुंबईत पाई जाऊ. पण वाहनावरचा तिरंगा काढणार नसल्याचेही जलील म्हणाले.
  • मुंबईत असलेल्या जामावबंदी आदेश आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेला परवानगी नाकारल्याबाबत विचारले असात इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'रॅलीला परवानगी घेतलेली आहे. त्यानंतर यावर निर्बंधाबाबत आमच्याकडे काहीही अधिकृत पत्र आलेलं नाही, असं जलील म्हणाले'.
  • प्रसारमाध्यमांनी संबंधित रॅली आणि सभेबाबत विचारले असता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, मुंबईत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी हा आदेश लागू केला आहे. मुंबईत ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टींचा विचार करुन काही गोष्टी टाळायला हव्यात. मात्र, त्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर होईल, मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय अंतिम असेल', असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
  • दरम्यान, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोप की, मुंबईत एमआयएमकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धोका आह. म्हणूनच औवैसी यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात येत आहे. मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव आहे. त्यामुळे मुंबई पोलिसही आमची रॅली आढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसते. आम्ही भारतीय नागरिक आहोत. आम्हाला मुंबईत जाण्याचा अधिकार आहे. काहीही झाले तरी आम्ही मुंबईत जाणारच, असेही इम्जियाज जलील यांनी म्हटले आहे.

इम्तिजाय जलील यांच्या आरोपाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता, जलील यांचा दावा फेटाळून लावत ते म्हणाले, हा आरोप अत्यंत चुकीचा आहे. केवळ एखाद्या पक्षाला धोका आहे म्हणून विरोध केला जातो आहे हे म्हणने सारासार चूक आहे. पोलीस त्यांच्या कर्तव्यावर ठाम आहेत. ते त्यांचे कर्तव्य बजावत असतात, असेही दिलीप वळसे-पाटील म्हणाले.