ATM Bank Of Maharashtra | (Photo credit: archived, edited, representative image only)

तब्बल 17 लाख रुपयांची रक्कम असलेलं ATM चोरट्यंनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात संगमनेर (Sangamner) येथील पुणे - नाशिक (Pune Nashik highway) महामार्गावर गुंजाळवाडी येथे असलेलं हे एटीएम बँक ऑफ महाराष्ट्रा (Bank of Maharashtra) चं असल्याचे समजते. ही घटना शनिवारी (22 जून 2019)  मध्यरात्री दिड ते दोन वाजनेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. एटीएममध्ये 17 लाख रुपये इतकी रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्या रकमेबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

प्राप्त माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावर गुंजाळवाडी येथे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. या शाखा कार्यालयाबाहेरच बँकेचे ATM आहे. चोरट्यांनी एटीएम मशिन असलेल्या खोलीचा काचेचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. गॅस कटरच्या सहाय्याने त्यांनी मशीनचा काही भाग कापला. त्यानंतर चोरट्यंनी थेट एटीएमच उचलून नेल्याचे प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, या एटीएममध्ये एकूण किती रुपये होते याचा अधिकृत तपशिल पोलीस, अथवा बँकेकडून उपलब्ध झाला नाही. मात्र, एटीएममध्ये 17 लाख रुपये असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान,  उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात घटास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे. (हेही वाचा, नाशिक: मुथ्थुट फायनान्स सशस्त्र दरोडा प्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात)

दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण, गेल्याच आठवड्यात नाशिक शहरातील उंडवाडी येथील मुथ्थुट फायनान्सच्या उंटवाडी येथील कार्यालयावर सशस्त्र दरोडा पडला होता. यात एक जण ठार तर, दोघे गंभीर जखमी झाले होते. ही घटना घडील त्या दिवशी सांगली जिल्यात मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तब्बल 25 लाख रुपये चोरट्यांनी पळविल्याची धक्कादायाक घटना घडली होती. त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.