अहमदनगर (Ahmedanagar) जिल्ह्यातील कोपरगाव (Kopargaon) तालुक्यात रविवार 15 मार्च रोजी एका शिवसैनिकाची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शिवसेनेचे (Shivsena) नगरमधील उपतालुका प्रमुख सुरेश गिरे (Suresh Gire) यांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजत आहे. हल्लेखोरांनी गिरे यांना त्यांच्याच घरात घुसून बेसावध असताना हल्ला केला, साहिजकच यामुळे गिरे यांना बचाव करणे किंवा प्रतिहल्ला करणे शक्य झाले नाही, ज्यामुळे जागच्या जागीच त्यांचा मृत्यू झाला. हे हल्लेखोर सध्या फरार आहेत, तसेच त्यांची नावे सुद्धा अद्याप समोर आलेली नाहीत. ही हत्या कोणत्या कारणातून झाली हे जरी स्पष्ट नसले तरी यामागे राजकीय व वैयक्तिक वैमनस्य हेच कारण असू शकते असा पोलिसांना प्राथमिकी माहिती आहे.(हेही वाचा, सांगली: धारधार शस्त्रांनी झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांचा मृत्यू)
पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेश गिरे यांच्यावर भोजडे या गावात हल्ला झाला, आपल्या गावातील घरी असताना संध्याकाळी साधारण 6 च्या सुमारास 5 ते 6 गुंडाची टोळी त्यांच्या घरी मोटारसायकल आणि कारमधून पोहचली. घरात घुसून त्यांनी गिरे यांना बेदम मारहाण केली, तसेच सोबत आणलेल्या धारदार हत्याराने त्यांच्यावर वार सुद्धा केला,यातील एकाने आपल्या सोबत आणलेल्या एका बंदुकीतून गिरे यांच्यावर गोळ्या झाडल्या ज्यांनंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेच्या नंतर कोपरगाव सहित सहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे. हे अज्ञात गुंड कोण याचा साड्या पोलिसांकडून तपास सुरु आहे, तूर्तास त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाअसून त्यांच्या शोधासाठी खास पोलिसांची टीम तैनात करण्यात आली आहे. या प्रकारचे अनेक प्राग यापूर्वी सुद्धा राजकीय मंडळींच्या बाबत घडले आहेत, अशा वेळी अनेकदा हल्लेखोरांच्या बाबत तपास सुरु केल्याचे समजते मात्र आरोपींना शिक्षा मिळण्याचे दाखले अत्यंत कमी आहेत.