
Ahmednagar Crime: अहमदनगर जिल्ह्यात तेलीखुंट भागातील एका मेडिकलच्या भिंतीली भगदाड पाडून चोरी (Robbery) केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेवरून असं दिसत आहे की, चोरट्यांना पोलिसांची भीतीच राहिली नाही. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. परिसरात चोरट्यांचा दहशत वाढल्याचे दिसून येत आहे. मेडिकलमधून गल्ल्यातील २० ते २५ हजार रुपये चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी मेडिकलचा मालकानी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलीखुंट परिसरात एक मेडिकल होते. हे मेडिकल मेहमूद कमाल शेख आणि फारुख कमाल शेख यांच्या मालकीच दुकान आहे. गुरुवारी रात्री दुकान बंद करून शेख घरी गेले होते, शुक्रवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर शेख यांना मेडिकलमध्ये वस्तूंची छेडकानी झाल्याचे निदर्शनास आले. दुकानाच्या भिंतीला भगदाड पडलेले दिसले आणि गल्लाचे कुलुप तुटलेले आढळून आले.
ही माहिती पोलिसांना देण्यात आली. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे आणि इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी परिस्थिती पाहणी केल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीत दिसल्याप्रमाणे एक चोरटा दुकानात आल्याचे स्पष्ट दिसून आले अशी माहिती सुत्रांनी दिली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.