अहमदनगर: आंतरजातीय मुलासोबत लग्न केल्याने आई-वडिलांनीच केली पोटच्या मुलीची हत्या
प्रतिकात्मक फोटो ( फोटो सौजन्य - Pixabay)

अहमदनगर (Ahmednagar) येथील एका आई-वडिलांनी आपल्या मुलीने आंतरजातीय मुलासोबत लग्न केल्यामुळे तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. तर आई-वडिलांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, प्रतिभा कोठावले असे या तरुणीचे नाव आहे. तर प्रतिभा आणि तिचा नवरा देवेंद्र यांनी गेल्या 24 दिवसांपूर्वी लग्न केले होते. तर हे दोघे एका मेडिकल स्टोरमध्ये कामाला असताना त्यांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र प्रतिभा हिने घरच्या मंडळींना देवेंद्र याच्याबद्दल सांगितल्यास तो आंतरजातीय असल्याने लग्नाला नकार दिला. त्यानंतर दोघांनी पळून जाऊन लग्न केले.(अहमदनगर: तमाशा मधील महिला कलाकारांना गावातील टोळीकडून मारहाण, 12 जण जखमी)

तर 24 एप्रिलला प्रतिभा हिला तिच्या घरातील मंडळींनी फोनवरुन तुझे देवेंद्र याच्यासोबत लग्न लावून देतो असे सांगितले. त्यानंतर प्रतिभा घरी आली त्यावेळी तिची आई-वडिलांकडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.