राज्यभरात आज 2359 ग्रामपंचायतीमध्ये (Grampanchayat) आज मतदान होत आहे. मात्र मतदानाच्या दिवशी अहमदनगरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या करंजीत मतदानानंतर एका व्यक्तीचा हृदयविकाराने धक्क्याने मृत्यू झाला आहे. सुनील गांधी असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे. मतदान कक्षाच्या बाहेर सुनील गांधी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. गांधी यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले. (हेही वाचा - Gram Panchayat Elections 2023: महाराष्ट्रात 2369 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान, सरपंच पदासाठी 130 ठिकाणी पोटनिवडणूक)
अहमदनगरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होतं. या निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यां बरोबरच विधानसभा आणि लोकसभेला इच्छुक असलेल्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या ग्रामपंचायतचे निकाल जाहीर होणार आहे.
अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील प्रामुख्याने लढती या जामखेड कर्जत मतदारसंघातील भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये होत आहे. दोन्हीही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही आता वर्चस्वाची लढाई ठरणार आहे.