अहमदनगर: लुडो खेळात पराभवाच्या रागातून 22 वर्षीय तरुणाकडून अल्पवयीन मुलाची हत्या
(संग्रहित प्रतिमा)

मोबाईलवर लुडो (Ludo) गेम खेळत असताना पराभव झाल्यामुले 22 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय मुलाची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कन्नड (Kannada) तालुक्यात घडली आहे. या प्रकरणातील आरोपी हे नात्याने भाऊ असून कन्नड पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. मृत आणि आरोपी हे मित्र असून जनावरांना चारण्यासाठी गावाजवळील जंगलात गेले असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे जवळच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

कौतिक नारायण राठोड असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. कौतिक राठोड हा आरोपी राहुल सुखराम जाधव (22) आणि याचा लहान भावासोबत जनावरांना चारण्यासाठी गावाजवळच्या जंगलात गेला होता. जंगलात गेल्या नंतर कौतिक, राहुल आणि त्यांचा भाऊ ही सर्व मुले पैशांने लुडो खेळत होते. परंतु, त्यावेळी कौतिक हा सारखा जिंकत होता. आरोपी राहुल याला पराभव सहन न झाल्याने तो कौतिकसह वाद घालू लागला. त्यानंतर या वादाचे मोठ्या भांडणात रुपांतर झाले. यातून राहुलने त्याच्या भावाच्या मदतीने कौतिकचा गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून हत्या केली. त्यानंतर कौतिकचा मृतदेह तिथेच टाकून दोन्ही आरोपी दुचाकीवरुन धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील मूळ गावाकडे प्रसार झाले. शुक्रवारी गावातील ग्रामस्थांना कौतिकचा मृतदेह आढळला. त्यानंतर ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. हे देखील वाचा- मुंबई: वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची कमाठीपूरा येथे आर्थिक वादातून हत्या

कन्नड पोलीस ज्यावेळी घटनास्थळी पोहचले, तेव्हा कौतिकच्या अंगावरील खजमी पाहून त्याचा खून झाल्याचे स्पष्ट केले. त्यावरून पोलिसांनी सूत्रे फिरवून राहुल सुखराम जाधव आणि त्याचा 14 वर्षीय भाऊ, विधिसंघर्षग्रस्त बालकाला धुळे जिल्ह्यात पकडण्यात आले. आरोपीचे कुटुंबीय हे कामासाठी कन्नड तालुक्यातील बुधमा तांडा या भागात आले आहेत. ते मूळचे धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील आहेत, अशी माहिती कन्नड पोलिसांनी दिली आहे.