महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ BJP च्या प्रचारासाठी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौर्‍यावर
Yogi Adityanath (Photo Credits: IANS)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)  10 ऑक्टोबर दिवशी मुंबईमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी प्रचार करण्यासाठी दाखल होणार आहेत. 10 ऑक्टोबर दिवशी मुंबईमध्ये 2 महाराष्ट्रात 4 सभांना योगी आदित्यनाथ संबोधित करणार आहेत. मुंबईत भाजप उमेदवार राहुल नार्वेकर, काळबादेवीच्या विठ्ठलवाडी मतदारसंघात तर संध्याकाळी कांदिवली येथे निर्मला कॉलेज जवळ 90 फीट रोड जवळ भाजपा शिवसेना युतीच्या अतुल भातखळकर यांच्या समर्थसाठी प्रचार सभा घेतल्या जाणार आहेत. मुंबईसोबतच रावेर आणि परभणी येथेही मतदारांसोबत योगी आदित्यनाथ संवाद साधणार आहेत. Maharashtra Assembly Election 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 'हे' असतील भाजपचे स्टार प्रचारक; पहा यादी

भाजपा नेते अमरजीत मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौर्‍यासाठी जनमानसांमध्ये मोठी उत्सुकता आहे. महाराष्ट्रातील एकदिवसीय दौर्‍यानंतर रात्री उशिरा योगी आदित्यनाथ लखनऊला परत जाणार आहेत. (हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2019: विधानसभा निवडणुकांनिमित्त महाराष्ट्रात नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या सभांचा धडाका; सीएम देवेंद्र फडणवीस घेणार तब्बल 65 सभा)

महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी 21 ऑक्टोबरला निवडणूका होतील तर 24 ऑक्टोबरला मतदान निकाल जाहीर केला जाणार आहे. आगामी निवडणूकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती आहे. काही ठिकाणी भाजपा विरूद्ध शिवसेना असा सामनादेखील पहायला मिळणार आहे.