Congress, NCP, Shiv Sena | File Photo

महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणूका पार पडून महिना उलटला, तरीही राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. दिल्लीमध्ये काल शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर आज (21 नोव्हेंबर) दिवशी कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) पुन्हा स्वतंत्र बैठक होणार आहे. दरम्यान कालच्या पत्रकार परिषदेमध्ये कॉंग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण 'सकरात्मक चर्चा' झाल्याचे संकेत दिल्यानंतर आता हळूहळू शिवसेना प्रणित राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस पक्षाची पावलं महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या दिशेने वळत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यात लवकरच राजकीय पेच प्रसंग सुटण्याची शक्यता असल्याचं चित्र आहे. राज्यात लवकरच स्थिर आणि लोकाभिमुक सरकार अस्तित्वात येईल; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता नवाब मलिक यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती.  

पृथ्वीराज चव्हाण यांनी काल रात्री पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचं नाव घेणं टाळलं आहे. मात्र आज सकाळी 10 च्या सुमारास होणार्‍या कॉंग्रेस, एनसीपी आणि शिवसेनेच्या संयुक्त बैठकीतून आता तोडगा निघेल अशी आशा आहे. दरम्यान काल सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली. शरद पवारांच्या घरी म्हणजेच 6 जनपथ वरदेखील सहा तासाहून अधिक वेळ बैठक पार पडली. आता सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी आणि महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आधार, पॅनकार्ड, पाच दिवसांचे कपडे घेऊन मुंबईत हाजीर हो.., शिवसेना आमदारांना पक्षनेतृत्वाचे आदेश.

दरम्यान महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार्‍या नव्या सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे सूत्र ठरल्याचा दावा राष्ट्रवादीकडून रात्री उशिरा करण्यात आल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. तर कॉंग्रेसला 5 वर्ष उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे.