Indian Railways | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

रेल्वे प्रवाशांना (Railway Passengers) रेल्वेच्या बोगीतील उपाहारगृहाची (Hotel) अनुभूती देण्याच्या दिशेने मध्य रेल्वेने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता  महाराष्ट्रातील इतर चार स्थानकांवर रेल्वेच्या बोगींमध्ये रेस्टॉरंटची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू झाली आहे. आतापर्यंत अशी सुविधा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबईच्या नागपूर स्थानकावर दिली जात होती. मध्य रेल्वेकडूनही यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेने अशा सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. आकुर्डी, चिंचवड, बारामती आणि मिरज स्थानकांवर लवकरच अशीच सेवा सुरू होईल, असा दावा रेल्वेने प्रसिद्धीमाध्यमांच्या वृत्तात केला आहे.

पायलट प्रोजेक्ट म्हणून मध्य रेल्वेने गेल्या वर्षी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ट्रेनच्या डब्यात रेस्टॉरंटची सुविधा सुरू केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला नागपूर स्थानकावर अशाच प्रकारचे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले होते. या दोन्ही रेस्टॉरंटला रेल्वे प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यात खाण्यापिण्याची एक वेगळीच अनुभूती प्रवाशांनी सांगितली आहे. अशी रेस्टॉरंट्स प्रवाशांना आवडत असतील तर रेल्वेने ती उपलब्ध करून द्यावीत, असे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे. हेही वाचा धक्कादायक! मुंबईत दीड वर्षात 1 हजार 962 प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू; रेल्वे पोलिसांनी दिली माहिती

या विचारांतर्गत चार नवीन स्थानकांवर अशी सुविधा सुरू करण्यात येत आहे. मध्य रेल्वेने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, रेल्वे बोगीच्या आत बांधण्यात येणार्‍या रेस्टॉरंटमध्ये एकाच वेळी 40 प्रवासी बसण्याची आणि त्यांच्या जेवणाची सोय केली जाईल. हे प्रवासी बसल्यानंतरही बोगीमध्ये जागा भरपूर असेल. त्यात पॅन्ट्री आणि कर्मचाऱ्यांसाठी जागा असेल. या रेस्टॉरंटमध्ये सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आणि फराळाची सोय केली जाईल. या संदर्भात मध्य रेल्वेने मंगळवारी एक प्रेस नोट जारी केली आहे.

मध्य रेल्वेने रेल्वे डब्यांमध्ये रेस्टॉरंट सुविधेसाठी चार नवीन स्थानके ओळखली आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आकुर्डी, चिंचवड, बारामती (पुणे) आणि मिरज ही चार स्थानके आहेत. लवकरच या चार स्थानकांवर रेल्वे डब्यांमध्ये रेस्टॉरंटची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा मुंबई आणि नागपूर स्थानकावर आधीपासून कार्यरत असलेल्या रेल्वे कोच रेस्टॉरंटच्या धर्तीवर असेल.