महाराष्ट्रात हळूहळू कोरोना वायरसच्या (Coronavirus) फैलावावर नियंत्रण मिळवत असताना एक छोटी चूक किती महागात पडू शकते याचा अनुभव आला आहे. जालना (Jalna) मधील खाणेपुरी (Khanepuri) गावात आठवडाभरात 66 जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आल्याची माहिती आरोग्य अधिकार्यांनी दिली आहे. या खाणेपुरी गावाची लोकसंख्या अवघी 1700 आहे.
PTI च्या वृत्तानुसार, ' 26 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान 66 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे रेहमानी शकील यांनी दिली आहे. 1 डिसेंबर या एका दिवसातच 35 गावकर्यांचे कोरोना रिपोर्ट पोझिटीव्ह आले आहेत. Mumbai: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.
जालनातील एका अन्य आरोग्य अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर दिवशी गावामध्ये सुमारे 200 जण एका स्थानिकाच्या अंत्यविधीला उपस्थित होते. येथे त्यांनी कोविड 19 ची नियमावली पाळली नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर गावामध्ये झपाट्याने कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. सध्या 66 कोरोनाबाधितांना कोविड 19 हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती शकिल यांनी दिली आहे. आतापर्यंत या जालना जिल्ह्यांत एकूण 12,100 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत तर 323 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य अधिकार्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात काल रात्रीपर्यंत 24 तासांत राज्यात 5182 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली होती. तर 8066 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले होते. एकूण 1703274 रुग्ण बरे होऊन डिस्चार्ज झाले आहेत. राज्यात एकूण 85535 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.7% झाले आहे.