Coronavirus Update In Palghar: पालघर जिल्ह्यात 24 तासांत 347 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 21 हजार 918 वर पोहचली आहे. त्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या 15 हजार 428 इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या 6490 रुग्णांचा समावेश आहे.
पालघर जिल्ह्यातील बोईसर, काटकरपाडा, खैरेपाडा, सरावली, बेटेगाव, कोलवडे, कुंभवली, पाम, टेंभी, सालवड, पास्थळ या गावांमध्ये तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कामगार वर्ग राहत आहे. या परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. (हेही वाचा - Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार! राज्यात आज 14,492 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, तर 297 जणांचा मृत्यू)
#पालघर जिल्ह्यात २४ तासांत ३४७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातली #कोवीड१९च्या रुग्णांची संख्या आता २१ हजार ९१८ वर पोहचली आहे. त्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या १५४२८ इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या ६४९० इतक्या रुग्णांचा समावेश आहे. @InfoPalghar
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 22, 2020
दरम्यान, मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई शहर, ठाणे, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज महाराष्ट्रात 14492 नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तसेच 297 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.