Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. आज राज्यात 14,492 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. तर 297 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 61 हजार 942 इतकी झाली आहे. आतापर्यंत 4,80,114 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय सध्या राज्यात 1 लाख 69 हजार 516 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

दरम्यान, देशात आज 10 लाख 23 हजार कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तर गेल्या 24 तासांत 63,631 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 74.69% एवढा झाला आहे. यामुळे मृत्यूदर कमी होऊन, आज तो 1.87% आहे. (हेही वाचा -Coronavirus Update: कोरोना व्हायरस रिकव्हरी मध्ये उल्हासनगर देशात प्रथम, दिल्ली दुसर्‍या स्थानी)

देशातील बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्येने एकूण सक्रीय रुग्णसंख्या ओलांडली आहे (6,97,330), जी 15 लाखांहून अधिक आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रत्यक्ष रुग्णभार म्हणजेच सक्रीय रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 23.43% सक्रीय रुग्ण आहेत. चाचण्यांमधून लवकर निदान, व्यापक देखरेख आणि संपर्क शोधण्याबरोबरच वेळेत आणि प्रभावी रुग्णालय उपचारामुळे रुग्ण लवकर बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या आणि कमी होत जाणारा मृत्यूदर यामुळे देशातील श्रेणीबद्ध आणि सक्रीय रणनितीचे प्रत्यक्ष यश दिसत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्या संयुक्त आणि निरंतर तसेच समन्वित प्रयत्नांमुळे भारताने गेल्या 24 तासांमध्ये 10 लाख लोकांच्या कोविड-19 चाचण्या पूर्ण केल्या. या यशामुळे देशामध्ये आत्तापर्यंत 3.4 कोटी जणांपेक्षा जास्त लोकांच्या (3,44,91,073)चाचण्या झाल्या आहेत.