मुंबई उच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण (Maratha Reservation) वैध ठरवत महाराष्ट्रभरातील मराठा समाजाला मोठा दिलासा दिला आहे. आरक्षण वैध ठरवत ते थेट 16% ऐवजी शिक्षणामध्ये 12% तर नोकरीमध्ये 13% आरक्षण सुचवलं आहे. मात्र मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratan Sadavarte) यांनी Maratha Reservation Verdict हा निकाल म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा भंग करणारं असल्याचा दावा केला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती सदावर्ते यांनी दिली आहे. Maratha Reservation Verdict: मराठा आरक्षण वैध पण 16% नाही, शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळणार; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
रणजित मोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय सुनावला. मात्र रणजित मोरेंचा निर्णय आक्षेपार्ह पद्धतीचा आहे. हा असंविधानिक, सदोष आणि संविधानाला नेस्तनाबूत करणारा निर्णय असल्याचं सांगत त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.मराठा आरक्षणाला आव्हान देणार्या याचिकेचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर न्यायालय परिसरात हल्ला, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
मराठा आरक्षण कायम ठेवले जाणार हा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर कोर्ट परिसरासह राज्यभरात मराठा समाजाने आनंद साजरा करण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्रीसह नेत्यांनी आज मराठा क्रांती मोर्च्याचे अभिनंदन केले आहे.