Pune Crime: पुण्यातून क्षुल्लक कारणावरून मित्राने दारुच्या नशेत मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात वाढत्या गुन्हेगारी पाहून नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दारून पिण्यासाठी गच्चीवर बसले असताना किरकोळ कारणावरून मित्राला गच्चीवरून ढकलून देऊन त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा तपास चंदननगर पोलिस ठाण्यात घेण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मित्राला बेड्या घातल्या आहे. ही घटना पुण्यातील नगर रस्त्यावरील वडगाव शेरी भागात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार बैजू मंडल आणि शंभु राम हे दोघेही मित्र होते. मजूरीसाठी पुण्यात भाड्याच्या खोलीत राहत होते. बैजू रोज किराणा दुकानातून उधारीवर सामान घेऊन येत असे ही बाब शंभुला कळताच त्याने दुकानदाराला बैजूला सामान देण्यास नकार दिला. दोघे जण रात्री गच्चीवर दारू पिण्यास बसले. थोड्याच वेळानं उभारीच्या किराणा मालाविषयी या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की शंभूने रागाच्या भरात बैजूला गच्चीवरून ढकलून दिले. या तो गंभीर जखमी झाला आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला.जवळच्या रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केले.
या प्रकरणी संतोष कोंडिबा गिनलवाड याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शंभूवर गुन्हा दाखल केला. शंभू दपी राम याला पोलिसांनी घरातून अटक केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे तपास करत आहेत.दोघे ही बिहार येथील रहिवासी आहे.