Palghar News: महाराष्ट्रातील पालघरमध्ये (Palghar) एक धक्कादायक घटना घडली आहे. पालघर येथील दोन कामगारांना विजेचा झटका लागून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघा तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आहे. एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी (10 फेब्रुवारी ) सकाळी झाली. इमारतीचं रंगकाम सुरु होताना ही दुर्घटना घडली. (हेही वाचा- हिंजवडी आयटी पार्कमध्ये दीवे लावतामा शॉक लागून 3 कामगारांचा मृत्यू)
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बोईसरच्या ओसवलामध्ये झाली आहे. सत्यम या इमारतीला रंग लावत असताना ही दुर्घटना घडली आहे. विद्युत तारांच्या संपर्कात आल्यानंतर दोघांना झटका लागला आहे. या दुर्घटनेत संदेश गोवारी या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर उत्तम सातवी हा कामगार गंभीर जखमी झाला आहे. जखमी कामागारावर साईलीला रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले आहे.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. योग्य दक्षता न घेतल्याने एकाने जीव गमावला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी आणि सामग्री न वापरल्याने अशा दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे.