पुणे-बंगळूरू महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, एक जखमी
Accident Representational image (PC - PTI)

पुणे-बंगळूरू महामार्गावर (Pune-Bengaluru Highway) आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणा-या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. यावरून हा अपघात किती भीषण होता याची कल्पना करु शकता. या अपघातात गाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून कार ही अतिशय वेगात कोल्हापूरहून पुण्याकडे जात होती. दुपारी दीडच्या सुमारास ही कार वहागांव गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्यामुळे महामार्ग ओलांडून पुण्याहून कोल्हापूरकडे जाणार्‍या लेनवर जाऊन ती अज्ञात वाहनावर आदळल्याने भीषण अपघात घडला. ज्यामध्ये तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.हेदेखील वाचा- Glacier Breaks in Uttarakhand: उत्तराखंडमधील जोशी मठाजवळील हिमकडा कोसळला, धरण फुटल्याने धौलीगंगेच्या पाणीपातळी वाढ; पहा व्हिडिओ

या अपघातात निलेश मोडकर, मनोज परब, अंकुश शिंदे, भरत बोडकर या चौघांचा जागीचा मृत्यू झाला तर रोशन वरद हा थोडक्यात वाचला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कार ही मुंबईच्या दिशेने जात असताना तिचा वेग हा जवळपास 160 असल्याचे स्पीडोमीटरच्या फोटो वरून दिसत आहे. ज्या वेळेला हा अपघात झाला त्या वेळेला स्पीडोमीटरही बंद पडले. या स्पीडोमीटरची नोंद पोलिसांनी आपल्या तपासादरम्यान करून घेतलेली आहे.

अपघातानंतर कारमधील पाच जणांपैकी एकाला बाहेर पडता आलं नाही. पाचही जण कार मध्येच अडकून पडले होते. चुराडा झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मात्र यावेळी घटनास्थळी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.