Mumbai Parel Bridge Accident: मुंबईच्या परळच्या ब्रिजवर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
Accident (PC - File Photo)

मुंबईतील (Mumbai Accident) परळ येथे एका बाईकवर ट्रिपल सीट (Tripal Seat) जात असलेल्या तिघांचा भीषण अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन तरुणींसह एकाचा मृत्यू झाला आहे. तनिष पतंगे (वय 24), रेणुका ताम्रकर ( वय 25) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. हे तिघेही बाईकवरुन ट्रिपल सीट जात होते. तेवढ्यात दुचाकी वरील ताबा सुटल्याने दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला आदळली आणि हा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दोन तरुणी आणि एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ( Mumbai Metro Service Disrupted: दहिसर कांदिवली दरम्यान मुंबई मेट्रो सेवा ठप्प, प्रवसी ट्रॅकवर उतरले (Watch Video))

हा अपघात इतका भीषण होता की बाईकचा समोरचा भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. डंपरला धडकल्यानंतर बाईवरील तिघेही जखमी झाले, त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला. या अपघातानंतर तिघांना तात्काळ केइएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या अपघातानंतर तिघांना तात्काळ केइएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.