Mumbai-Pune Expressway वर भीषण अपघात; दोन ठार, तर एक गंभीर जखमी (See Photo)
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे.

आज सकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ एका ट्रक आणि टेम्पोची जोरदार धडक झाली. त्यातील जखमी व्यक्तीला लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांची अजून ओळख पटविण्याचं काम सुरु आहे.

या भीषण अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही विस्कळीत झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट वाहतूक मदत चौकी आणि खोपोली पोलीस घटनास्थळी पोहोचले व मदतकार्य सुरु केले. परंतु झालेला अपघात इतका भीषण होता की टेम्पोत बसलेले दोघेजण जागीच ठार झाले. अपघात झालेला टेम्पोमध्ये नारळाच्या गोणी भरल्या होत्या परंतु टेम्पोची धडक होताच त्या सर्व गोण्या रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्या.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अपघात: महामार्गावरील चुकीच्या पार्किंगमुळे 2 वर्षांत 106 जणांचा मृत्यू

गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) झालेल्या अपघातांमध्ये एकूण 106 जणांचा मृत्यू झाला असून महामार्गावर उभी असलेली वाहने, वाहने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वाहनांचा वेग, चालकाच्या चुका आदी कारणांमुळे हे अपघात घडून आले आहेत.