Accident In Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेदरम्यान अपघात, ट्रकची दोघांना धडक, एक ठार
Rahul Gandhi | (Photo Credit- Bharat Jodo Yatra)

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज 65वा दिवस आहे. सध्या महाराष्ट्रातून मार्गक्रमण करणारी ही यात्रा नांदेड जिल्ह्यातून आज (10 नोव्हेंबर) हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करते आहे. या यात्रेत आज एक धक्कादायक अपघात घडला. सकाळी नऊच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रकने दोघांना उडवले. या घटनेत एक जण ठार झाला. दुसरा एक किरकोळ जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार ही घटना नांदेड जिल्ह्यातील नांदेड-अकोला महामार्गावर घडली.

नांदेड जिल्ह्यात असलेली भारत जोडो यात्रेच्या चौथ्या दिवशी यात्रा मोंढा परिसरात होती. मोंढा परिसरात राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेनंतर यात्रा पिंपळगाव येथील थांब्याकडे निघाली. दरम्यान रात्री नऊ वाजणेच्या सुमारास यात्रा थांब्याकडे जाण्यासाठी ल नांदेड-अकोला महामार्गावरून पायी निघाली होती. यादरम्यान नांदेड अकोला महामार्गावरुन पायी निघालेल्या लोकांना एका भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघाता गणेशन (62) आणि सययुल (30) या दोघांना जोराद धडक बसली. या दरम्यान, गणेशन यांचे जागीच निधन झाले. तर सययुल यांच्यावर उपचार सुरु आहेत. गणेशन आणि सययुल हे तामिळनाडूचे रहिवासी आहेत. (हेही वाचा, Aditya Thackeray Joins Bharat Jodo Yatra: आदित्य ठाकरे आज होणार भारत जोडो यात्रेत सहभागी, राहुल गांधी यांच्यासोबत साधणार संवाद)

अपघाताचे वृत्त कळताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार मोहन हंबर्डे यांनी सययुल याच्यावर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयाततातडीने उपस्थिती लावली. त्याच्यावर प्रदीर्घ काळ उपचार सुरु होते. दरम्यान, अशोक चव्हाण रात्री साडेबारा वाजेबर्यंत रुग्णलयातच होते असे समजते. गणेशण यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

दरम्यान, तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेली यात्रा शुक्रवारी 65व्या दिवसात दाखल झाली. शेजारच्या तेलंगणातून ते महाराष्ट्रातील नांदेडमधील देगलूर येथे 7 नोव्हेंबरला रात्री पोहोचले होते आणि पाच दिवसांपासून जिल्ह्यात होते.नांदेडच्या अर्धापूर येथील पिंपळगाव महादेव येथील विठ्ठलराव देशमुख कार्यालयात यात्रेचा रात्रीचा मुक्काम होता. दाभड येथून नांदेड-हिंगोली रोडवर अर्धापूर येथे शुक्रवारी सकाळी पदयात्रेला पुन्हा सुरुवात झाली. दिवसाच्या उत्तरार्धात ही यात्रा चोरंबा फाटा येथून पुन्हा सुरू होऊन रात्री हिंगोली येथे पोहोचेल. सकाळी सहाच्या सुमारास यात्रा पुन्हा सुरू झाल्यानंतर रस्त्यावरच राहूल गांधीजींचे स्वागत करण्यात आले. काँग्रेस नेत्याने वाटेत स्थानिक रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.