आरे रोड आज दुपारी 12 ते उद्या दुपारी 12 म्हणजे 24 तासांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. MMRC आणि MCGM द्वारे सुरू असलेल्या विविध कामांसाठी हा रस्ता तात्पुरता बंद केला आहे. तरी या मार्गावरील पवई आणि मरोळला जाणारी वाहनं JVLR रस्त्याने वळवल्याची माहिती मुंबई वाहतुक विभागाकडून (Mumbai Traffic Police) देण्यात आली आहे. या दरम्यान मेट्रो कारशेडसाठी (Metro Car Shed) झाडं कापयला सुरुवात केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी आरेतील (Aarey Fotrest) मेट्रो प्रकल्पासाठी नव्याने झाडे कापावी लागणार नाहीत, असे म्हटले होते. पण 24 तास आरे रोड (Aarey Road) बंद म्हणजे आता परिसरात झाडे कापण्यासाठी रोड बंद केला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्यात ठाकरे सरकार (Thackeray Government) असताना 808 एकर (Acres) जंगलक्षेत्र घोषित करत कारशेड कांजूरमार्गला (Kanjurmarg) स्थलांतरीत करण्यचा निर्णय घेण्यात आला होता. मेट्रो कारशेडच्या (Metro Car shed) स्थलांतराचा निर्णय बदलून कारशेड आरेतच ( R A Forest) बनवण्याचा निर्णय नवनिर्वाचीत शिंदे (CM Eknath Shinde) सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवला आहे. काल यासंबंधीत पर्यावरणवाद्यांकडून देशभरात आंदोलनही करण्यात आलं आहे. तर आज अचानक असा आरे रोड 24 तासांसाठी बंद करणं की ही पर्यावरणवाद्यांच्या दृष्टीने संशयास्पद बाब आहे. तरी या 24 तासात आरे मध्ये काय होणार असा सवाल निर्माण झाला आहे. (हे ही वाचा:- Save Aarey: आरे वाचवा मोहिमेसाठी आज देशभरात पर्यावरणवाद्यांची निदर्शनं, आंदोलनात आम आदमी पक्षाचाही सहभाग)
एमएमआरसी व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामामुळे रात्री १२ पासून पुढील २४ तासासाठी आरे रोड वाहतुकीकरिता तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.
नागरिकांनी कृपया पवई/मरोळ येथे ये जा करण्यासाठी जेव्हीएलआर मार्गाचा वापर करावा.#MTPTrafficUpdates pic.twitter.com/QkY6tnn48c
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) July 25, 2022
आरे वाचवाच्या एल्गारात आता आम आदमी पक्षही (Aam Admi Party) उडी घेतली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील आरे बचाव मोहमेसाठी मैदानात उतरले आहेत. 'आरे' कारशेडबाबत 'नव्या उपमुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) पुनर्विचार करावा', अशी मागणी करणारी पोस्ट अमित ठाकरेंनी केली होती. म्हणजेच राजकीय मतभेद असले तरी आरे वाचवण्यासाठी ठाकरे पुत्र पुढे आले आहेत. देशभरात आरे वाचवा चा एल्गार बघता आरे संरक्षणाचा हा वाद शिगेला पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.