Save Aarey: आरे वाचवा मोहिमेसाठी आज देशभरात पर्यावरणवाद्यांची निदर्शनं, आंदोलनात आम आदमी पक्षाचाही सहभाग

पर्यावरणवाद्यांनी आरे कारशेडला विरोध दर्शवत आज मुंबईसह नागपूर, वाराणसी, हैदराबादमध्ये निदर्शनं करण्यात आली.

Save Aarey: आरे वाचवा मोहिमेसाठी आज देशभरात पर्यावरणवाद्यांची निदर्शनं, आंदोलनात आम आदमी पक्षाचाही सहभाग
Aarey Colony (Photo credits: Video grab)

मुंबईतील (Mumbai) मेट्रो कारशेडच्या (Metro Car shed)  स्थलांतराचा निर्णय बदलून कारशेड आरेतच ( R A Forest) बनवण्याचा निर्णय नवनिर्वाचीत शिंदे (CM Eknath Shinde) सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवत आज मुंबईसह (Mumbai नागपूर (Nagpur), वाराणसी (Varanasi), हैदराबादमध्येही (Hyderabad) निदर्शनं करण्यात आली. तसेच आरे वाचवाच्या एल्गारात आता आम आदमी पक्षही (Aam Admi Party) मैदानात उतरला आहे. गेल्या दोन रविवारपासून आरे वाचवाच्या (Save Aarey) पार्श्वभुमिवर मुंबईत पर्यावरण वाद्यांकडून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्यात येत पण यावेळी फक्त राज्यातचं नाही तर संपूर्ण देशभरात आरे वाचवा मोहिमेचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

 

गेल्या आठवड्यात मुंबईत पर्यावरणवाद्यांनी 'आरे वाचवा' आंदोलन शांततापूर्ण पध्दतीने केलं होतं तर आरे जंगलातील (Aarey Forest) मेट्रो कारशेडविरोधात (Metro Car Shed) पर्यावरणवादी संघटनांच्या या आंदोलनाला माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) हजेरी लावली होती. आंदोलनात सहभागी होत आदित्य ठाकरे  म्हणाले, आरेची लढाई ही  जंगल सुरक्षेची लढाई म्हणजे देशाची लढाई आहे. ही लढाई प्रत्येक मुंबईकराच्या हितासाठीची लढाई आहे. राज्यात ठाकरे सरकार (Thackeray Government) असताना 808 एकर (Acres) जंगलक्षेत्र घोषित करत कारशेड कांजूरमार्गला (Kanjurmarg) स्थलांतरीत करण्यचा निर्णय घेण्यात आला होता. कारशेड कांजूरमार्गला बनवल्यास जंगल आणि पैसे या दोन्ही गोष्टी वाचवता येईल. (हे ही वाचा:-Sandipan Bhumare: आदित्य ठाकरेंच्या पैठण दौऱ्यानंतर बंडखोर आमदार संदिपान भुमरे यांची ऑडिओ क्लीप व्हायरल)

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील आरे बचाव मोहमेसाठी मैदानात उतरले आहेत. 'आरे' कारशेडबाबत 'नव्या उपमुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) पुनर्विचार करावा', अशी मागणी करणारी पोस्ट अमित ठाकरेंनी केली होती. म्हणजेच राजकीय मतभेद असले तरी आरे वाचवण्यासाठी ठाकरे पुत्र पुढे आले आहेत. देशभरात आरे वाचवा चा एल्गार बघता आरे संरक्षणाचा हा वाद शिगेला पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

(The above story first appeared on LatestLY on Jul 24, 2022 03:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).