
गेल्या काही दिवसांपासून आरे परिसरात मेट्रो उभारणीच्या प्रकरणावरुन वाद चंगालाच गाजला होता. त्यानुसार हजारो झाडांची कत्तल करण्यात आल्याने अनेकांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला. परंतु आता आरेची देखभाल करणाऱ्या डेअरी विभागाकडून MMRDA ला मेट्रो भवन उभारण्यासाठी हिरवा कंदील दाखवल्याने त्याचा कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र बांधकाम सुरु होणाऱ्या ठिकाणी अजून 70 झाडे कापली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर प्राधिकरणाकडून असा दावा करण्यात आला आहे की, मेट्रो भवन निर्मितीच्या कामामुळे पर्यावरणाला कोणतेही नुकसान होणार नाही आहे.
मेट्रो भवन ही 32 मजली टोलेजंग इमारत उभारण्यात येणार आहे. येथून मुंबईच्या मेट्रोतील 14 मार्गावर नियंत्रण ठेवण्याचे काम पार पडणार आहे. या मधील एका मार्गाचे काम अद्याप शिल्लक असून अन्य 13 मार्गावरील काम पूर्ण होण्याचा मार्गावर आहे. 11 ऑक्टोबरला डेअरी विभागाकूडून पत्राच्या माध्यमातून 2.03 हेक्टर क्षेत्राअंतर्गत मेट्रो भवन आणि मेट्रोच्या अन्य कामासांठी परवागनगी देण्यात आली आहे. डेअरी विभागकडून मेट्रो भवनासह अन्य कामांसाठी देण्यात आलेल्या जागेअंतर्गतच काम पूर्ण करावे. तसेच एमएमआरडीएने याबाबत वेळोवेळी माहिती डेअरी विभागाला देणे अनिवार्य आहे. त्याचसोबत डेअरी विभागाचे अधिकारी ही या प्रकरणी मेट्रोच्या कामाबाबत आढावा घेत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(Aarey Forest Protest: आरे वृक्षतोडीला विरोध प्रकरणी अटकेत असलेल्या 29 आंदोलकांना बोरिवली कोर्टाकडून जामिन मंजूर)
तर मुंबई उच्च न्यायालयाकडून मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी वृक्षतोडीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली होती.त्यानंतर 4 ऑक्टोबरच्या रात्री उशिरापासून झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली. यामुळे पर्यावरणप्रेमींनी आरे जंगलात धाव घेत त्याच्या विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. पुढील दोन दिवस हे आंदोनल सुरु राहिल्याने पोलिसांनकडून काही जणांची धरपकड सुद्धा करण्यात आली होती.