Aaditya Thackeray | (Photo Credit - Twitter)

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर (CM Eknath Shinde) हल्लाबोल केला आहे. मातोश्रीवर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी मुंबई मध्ये रस्त्यांच्या रखडलेल्या कामाकडे लक्ष वेधून घेतलं आहे. काहींनी खडी पुरवठादारांवर दबाव आणून एकाच कंपनीकडून खडी घेण्यास भाग पाडल्याची सध्या चर्चा असल्याचा दावा केला आहे. यामुळेच खडीचे दर 50 टक्क्यांहून जास्त वाढले असून त्याचा परिणाम कामावर आणि आर्थिक स्थितीवर होणार आहे. असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ही कंपनी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याचं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही आरोप केले आहेत.

मुंबईमध्ये 400 किमीचे रस्ते क्रॉंकेटचे काम सुरू केल्याचे केवळ दावे करण्यात आले आहेत. पण सध्या काहीच सुरू झाले नाही.असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांच्याजवळच्या कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर चा फायदा करून देण्यासाठी सारे प्रयत्न सुरू आहेत का? असा सवाल विचारण्यात आला आहे. Aaditya Thackeray On Proposed Concretisation of Roads in Mumbai: मुंबई मध्ये प्रस्तावित रस्त्यांच्या क्रॉंकेटीकरणावरून आदित्य ठाकरे यांचा पुन्हा हल्लाबोल; विचारले हे '10' प्रश्न .

मुंबईतील कॉंक्रीट रस्त्याचे कंत्राटं काढून तीन महिने झाले, पण अजूनही काम सुरू झालेलं नाही. राज्यात विकासाच्या नावावर केवळ घोटाळे सुरू आहे. हा मुंबईकरांचा पैसा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा डाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली. घोषणा करताना सीसीटीव्ही लावले जातील. काम कुठं पर्यंत पोहचलं त्याची माहिती लोकांना कळवली जाईल पण त्याचा देखील पत्ता नसल्याचं ते म्हणाले आहे.

दरम्यान खारघर मधील उष्माघातामुळे झालेल्या जीवहानी वर बोलताना प्रतिक्रिया देताना 25 कोटी खर्चून जर कार्यक्रम केला जातो तर त्यामध्ये सगळ्यांची सोय का पाहिली गेली नाही. यामध्ये कॉन्ट्रॅक्टर कोण होतं? त्याच्याकडून कामात काही हलगर्जीपणा झाला का? हे तपासावं असे ते म्हणाले आहेत.